बापरे..७० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी आरटीओ अधिकारी राजेंद्र केसकर
आणि खासगी इसम ताब्यात.. घरातील
झडतीत ४ कोटी २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..
गोंदिया :- बारामतीतून नुकताच बदली करून गेलेले आरटीओ अधिकारी यांना लाच घेताना अटक करण्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी की,गोंदिया येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) राजेंद्र सदाशिव केसकर आणि रामनगर येथील खासगी व्यक्ती राजेश रामनिवास माहेश्वरी(५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७० हजार
रुपयांची लाच घेताना गुरुवारी (४) ताब्यात घेतले.लाचलुचपत विभागाने कारवाई केल्यानंतर केसकर यांच्या पुण्यातील घरावर झडती घेतली. या झडतीत घरातून ६ लाख ६६ हजार रुपये रोख, सोने, चांदीचे दागिने, तसेच स्थावर आणि जंगम मालमत्तेसह ४ कोटी २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक तपासानुसार,राजेंद्र केसकर यांनी गोंदिया येथील आरटीओ कार्यालयात परराज्यातील जेसीबी वाहनाच्या पासिंगसाठी संबंधित तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच मागितली होती.
यासाठी त्यांनी खासगी व्यक्ती राजेश माहेश्वरी याच्या माध्यमातून लाच घेतली.नागपूर न्यायालयात हजर -नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी
केसकर आणि माहेश्वरी यांना गोंदिया येथील न्यायालयात हजर केले. केसकर यांनी पूर्वी बारामती येथेसुद्धा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले होते.गुरुवारी झालेल्या अटकेनंतर शुक्रवारी आरटीओ कार्यालयात संपूर्ण शांतता पसरली होती. कर्मचारी व अधिकारी या कारवाईमुळे चिंतेत असून, या प्रकरणामुळे कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने सरकारी
अधिकारी व कर्मचारी यांना कठोर संदेश दिला आहे की,भ्रष्टाचाराच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे अधिकारी यांनी सांगितले.या कारवाई मुळे आरटीओ कार्यालयातील एजंट असणाऱ्याचे धाबे दणाणले असून मासिक 3 हजार ओव्हर लोड च्या वाहनांकडून घेणारे अधिकारीवर अशी कारवाई होईल का?अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे.
No comments:
Post a Comment