बापरे..मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हंटलाने दुकानदाराचे अपहरण करत केली मारहाण..
बारामती: मटण घ्यायला आलेल्या व्यक्तीला लाईनमध्ये थांब म्हटल्याचा राग आला आणि त्याने थेट मटण दुकानदाराचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना बारामतीमध्ये घडली. 'लाईनमध्ये थांबायला वेळ नाही, मी मोठा अधिकारी आहे' अशी मग्रुरी
दाखवणाऱ्या इसमाने सहकाऱ्यांच्या मदतीने थेट मटण दुकानदाराचे अपहरण केलं आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं.
या प्रकरणी एकाला बारामती पोलिसांनी अटक केली आहे.बारामतीतील ज्ञानेश्वर भारत आटोळे हा तरुण सूर्यनगरी येथे 'जय भवानी मटन शॉप' चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. 21 डिसेंबरला मटन खरेदी करण्यासाठी आलेल्या
एका व्यक्तीने लाईनमध्ये उभे राहण्यास नकार दिला.'गुगलवर माझं नाव शोध, मी मोठा अधिकारी आहे' अशी दमदाटी त्याने केली. त्यावेळी वाद-विवाद झाला आणि वजनाचा काटा उचलून मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तो
व्यक्ती मटन घेऊन निघून गेला, मटण
दुकानदाराचे अपहरण या घटनेचा राग मनात धरून त्या व्यक्तीने बदला घेण्यासाठी ऋषी गावडे याला सुपारी दिली. त्यानंतर ऋषी गावडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याला
25 डिसेंबर रोजी गाठले. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट आणि क्रेटा गाड्यांमधून आलेल्या पाच इसमांनी ज्ञानेश्वर आटोळे याला जबरदस्तीने स्विफ्ट कारमध्ये बसवले. ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी मटणाच्या दुकानावर वाद घालणारा व्यक्ती हा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ऋषी गावडेच्या संपर्कात होता. मी सांगितले तसेच करा, मला
बघू द्या याच्यात किती दम आहे' असे म्हणत त्याने मारहाणीचे आदेश दिल्याचा आरोप आहे.
कन्हेरी रोड आणि जळोची ब्रिज परिसरात नेऊन आरोपींनी कोयत्याचे मुठीने, बेल्टने आणि लाथा-बुक्क्यांनी मटण दुकानदाराला मारहाण केली. तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली. यानंतर ऋषी गावडे यानेही शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप नोंदवण्यात
आला आहे.या प्रकरणी अपहरण करून मारहाण करणे आणि इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी ऋषी गावडे यास पोलिसांनी अटक केली असून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी त्याला तीन दिवसांची
पोलीस कोठडी सुनावली आहे. संकेत मुसळे, शितल बेंगारे (रा. पारवडी) हे सुद्धा गुन्ह्यात सहभागी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. इतर आरोपींबाबत तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment