खळबळजनक..अंगावर किलोभर सोनं असणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराला निर्घृणपणे संपवलं.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 27, 2025

खळबळजनक..अंगावर किलोभर सोनं असणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराला निर्घृणपणे संपवलं..

खळबळजनक..अंगावर किलोभर सोनं असणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराला निर्घृणपणे संपवलं..
सोलापूर :-नुकताच खोपोली येथे नगरसेवक पतीची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा नगरसेवक पदासाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवाराची हत्या करण्यात आली याबाबत मिळालेली माहितीनुसार सोलापूर शहरातील
गजबजलेल्या ठिकाणी एका तृतीयपंथीयाची हत्या झाली आहे. या हत्येनं खळबळ उडाली आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या एका भावी नगरसेवकाची हत्या झाली आहे.अय्युब सय्यद (वय 40 वर्ष, रा लष्कर, सोलापूर) असं त्या तृतीयपंथीयाचं नाव आहे. अय्युब सय्यद हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होते.त्यांनी प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती, मात्र त्यापूर्वीच हत्या झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी माहिती देताना सांगितलं की, अयुब सय्यद यांच्याकडे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने होते. हत्या करणाऱ्यांनी सर्व सोने लंपास केले आहेत. हत्या करणाऱ्यांनी कानातील  सोनं ओरबाडून कान फाडून घेऊन गेले आहेत,तृतीयपंथी अय्युब सय्यदयांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून तयारी सुरू केली होती. अय्युब सय्यद यांनी त्यांच्या प्रचाराचे व्हिडिओ आणि फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला लाखोंच्या संख्येने प्रतिसाद मिळत होते.अय्युब सय्यद यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळत होती. पारलिंगी समुदायातील व्यक्ती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणुकीआधीच पारलिंगी अय्युब सय्यद
यांच्या हत्येमुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला मोठा धक्का बसला आहे.निवडणूकेचे वातावरण तापत असले तरी हत्या करण्यापर्यंत मजल जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment