बारामतीत निवडणूकीत पैसा जिंकला; विकास हरला..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 30, 2025

बारामतीत निवडणूकीत पैसा जिंकला; विकास हरला..!

बारामतीत निवडणूकीत पैसा जिंकला; विकास हरला..!                                                           बारामती:- नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका झाल्या यामध्ये बारामती नगरपरिषद निवडणूक मोठया वातावरणात आरोप प्रत्यारोप करीत पार पडली, प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार उभे केले,कधी नव्हे ती बारामतीच्या इतिहासात निवडणूक पुढे ढकलली, सुरुवातीला विरोधात चांगले वातावरण होते तसे जनतेतून चर्चा होत्या किमान  दहा ते पंधरा उमेदवार नक्की निवडून येतील तसे वातावरण देखील झाले होते, पण 2 डिसेंबर ची तारीख 20 डिसेंबर वर गेली आणि झालेला व नेटाने केलेला प्रचार डळमळीत झाला,अश्यातच आठ नगरसेवक बिनविरोध झाले हे कशामुळे झाले हे लोकांना माहीतच आहे,त्यातच जे लढले ते कशाच्या जोरावर व मतदारांना आर्थिक माया किती वाटली हे सर्वज्ञात आहे, मात्र यात एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे विकसित बारामती व केलेला विकास हा पूर्णपणे बाजूला झालेला दिसत होता, कारण फक्त प्रभागात 30 ते 50 लाख रुपयांची धूळधाण झाली याचीच चर्चा ऐकावयास मिळत होती, मतदानाच्या दिवशी व आदल्या दिवशी उमेदवाराचे कार्यकर्ते मताची जुळवा जुळवी करीत होते, व त्याचे पैसे देत होते याचीच चर्चा होताना दिसत आहे.मग झालेला विकास कुठे गेला,विकासाच्या नावावर मते मिळाली का याचं आत्मचिंतन होईल का?जर विकास पाहिला असता तर संपूर्ण नगरपरिषद बिनविरोध का होऊ शकली नाही, याठिकाणी सर्वात मोठा विरोध का होतोय हे विचार करण्यासारखं आहे.

No comments:

Post a Comment