बारामती :-बारामती शहरातील कसबा येथील साठे नगर चौक परिसरात असलेल्या एका दारूच्या दुकानावर चोरट्यांनी थेट धाड टाकत दारूच्या बाटल्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे आणि संगणक असा तब्बल ४ लाख ५ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,कसबा येथील साठे नगर चौकातील नितीन वाईन शॉप येथे अज्ञात
चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या चोरून नेण्यात आल्या. विशेष म्हणजे, चोरी केल्याचा कोणताही पुरावा राहू नये यासाठी चोरट्यांनी दुकानात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तसेच त्याचा संगणक ( डीव्हीआर सिस्टम) देखील उचलून नेल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी केवळ मालच नाही तर सुरक्षा यंत्रणाही चोरी करून नेली आहे,दिलेल्या तक्रारीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment