धक्कादायक..आईनं पोटच्या दोन मुलांची निर्घृण हत्या करत पतीवर कोयत्याने केला हल्ला.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 8, 2025

धक्कादायक..आईनं पोटच्या दोन मुलांची निर्घृण हत्या करत पतीवर कोयत्याने केला हल्ला..

धक्कादायक..आईनं पोटच्या दोन मुलांची निर्घृण हत्या करत पतीवर कोयत्याने केला हल्ला..
दौंड:-पोटच्या मुलांचा घात करण्याची वेळ एका आईवर आली ही दुर्दैवी घटना नुकताच घडली या घटनेने हादरा बसला असून याबाबत  मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका उच्च शिक्षित महिलेनं पोटच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी महिलेनं दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्यानंतर धारदार कोयत्याने आपल्या पतीवर देखील हल्ला केला.
या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. शनिवारी भल्या पहाटे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी खूनाच्या कलमासह गुन्हा दाखल केला आहे.
कोमल मुंढे असं आरोपी महिलेचं नाव आहे. तर १ वर्षांचा मुलगा शंभू मिंढे आणि ३ वर्षांची मुलगी पियू मिंढे असं हत्या झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत. आरोपी महिलेनं
पती दुर्योधन मिंढे यांच्यावरही कोयत्याने हल्ला केला आहे.दुर्योधन यांच्या मानेवर आणि हातावर दुखापत झाली आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी महिलेला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दुर्योधन मिंढे हे आयटी इंजिनिअर असून ते दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली
गावातील रहिवासी आहेत. ते पुण्यातील खराडी येथील एका आयटी कंपनीत नोकरीला आहेत. सध्या त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलं असून ते घरूनच काम करतात. स्वामी चिंचोली याठिकाणी त्यांचा बंगला आहे. या बंगल्यात ते
पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले होते. शनिवारी पहाटे पत्नीने आपल्या दोन्ही मुलांची गळा घोटून हत्या केली.यानंतर तिने धारदार हत्याराने झोपलेल्या पतीवर हल्ला केला. या हल्ल्यात पती दुर्योधन गंभीर जखमी झाले.
त्याच्या मानेवर आणि हातावर दुखापत झाली. पहाटे घडलेल्या या प्रकारानंतर तातडीने दुर्योधन यांना बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही चिमुकल्या मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले
आहेत. दोन मुलांची हत्या आणि पतीवरील जीवघेणा हल्ला या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी महिलेला अटक केली आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप समोर आलं
नाही. मात्र महिलेनं संपूर्ण कुटुंब संपवण्याच्या हेतूनेच हा हल्ला केल्याचं सांगण्यात येतंय. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment