श्री जाणता राजा युवा प्रतिष्ठान तर्फे वडगाव निंबाळकर मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे केले होते आयोजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 9, 2025

श्री जाणता राजा युवा प्रतिष्ठान तर्फे वडगाव निंबाळकर मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे केले होते आयोजन..

श्री जाणता राजा युवा प्रतिष्ठान तर्फे वडगाव निंबाळकर मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे केले होते आयोजन..
वडगाव निंबाळकर:-श्री जाणता राजा युवा प्रतिष्ठान तर्फे वडगाव निंबाळकर मध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, यावेळी ४५ मंडळे एकत्र येऊन जोपसली सामाजिक बांधिलकी. रक्तदान ग्रामीण भागातील विक्रमी नोंद झाली,रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे मानले जाते याचेच औचित्य साधून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने दरवर्षी सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम ठेवण्यात येते यावर्षी देखील शिवजयंती निमित्त रविवार दि. 9- 2 -2025 रोजी 9 ते 5 या वेळेत भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .सकाळ पासून रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन वडगाव निंबाळकर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी करण्यात आले होते. रक्तदान शिबिरामध्ये एकूण 205 रक्तदात्यांनी रक्तदान केले . रक्तदान शिबिरामध्ये वडगाव निंबाळकर मधील सर्व तरुण मंडळी , ग्रामस्थ, डॉक्टर , आशा सेविका, महिला यांनी यामध्ये सहभाग घेत रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले .

No comments:

Post a Comment