देशी बनावटीचे गावठी पिस्टल मॅग्झीनसह व ७ जिवंत राउंड सह २६,४००/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 14, 2026

देशी बनावटीचे गावठी पिस्टल मॅग्झीनसह व ७ जिवंत राउंड सह २६,४००/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त..

देशी बनावटीचे गावठी पिस्टल मॅग्झीनसह व ७ जिवंत राउंड सह २६,४००/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त..
इंदापूर :-मा.संदिपसिंह गिल्ल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे
अन्वेषण शाखेस पुणे ग्रामीण हददीतील अवैध अग्निशस्त्राचा वापर करणारे
गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे
श्री.प्रमोद क्षीरसागर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण
यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस फौजदार शिवाजी निकम, पो.हवा किशोर तेलंग, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, पो.
अंमलदार गणेश डेरे, तुषार चव्हाण असे इंदापुर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग
करीत असताना पो. अंमलदार गणेश डेरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीने इसम नामे रोहन उर्फ सोन्या महेंद्र चव्हाण वय २२ वर्षे रा. कालठण नं. २ ता. इंदापुर जि. पुणे यास शिताफीने ताब्यात घेवुन त्याचेकडून एक देशी
बनावटीचे गावठी पिस्टल मॅग्झीनसह व ७ जिवंत राउंड असा एकुण
२६,४००/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी
विरुदध भारतीय शस्त्र अधिनियमानुसार इंदापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
.
सदरची कामगिरी मा. संदिपसिंह गिल्ल सोो पोलीस अधिक्षक पुणे
ग्रामीण,मा.गणेश बिरादार अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग बारामती, मा.
डॉ.सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती,मा.
प्रमोद क्षीरसागर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण
यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस फौजदार
शिवाजी निकम, पो.हवा किशोर तेलंग, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, पो.
अंमलदार गणेश डेरे, तुषार चव्हाण यांनी केली.

No comments:

Post a Comment