राज्यस्तरीय पेंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या सफान पठाणचे रौप्यपदक..
बारामती:- बारामती येथील योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीचा 10 वर्षीय खेळाडू सफान पठाण याने राज्यस्तरीय पेंच्याक सिलाट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत 25 किलो वजनी गटात रौप्यपदक (सिल्वर मेडल) पटकावले.
सफानने पुणे ग्रामीण संघाचे प्रतिनिधित्व करत राज्यभरातील बलाढ्य खेळाडूंना कडवी झुंज दिली. आपल्या जिद्द, चिकाटी आणि नियमित सरावाच्या जोरावर त्याने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत रौप्यपदकावर नाव कोरले.
सफानच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक साहेबराव ओहोळ सर यांचे मार्गदर्शन आणि योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीतील नियमित प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अकॅडमी, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच बारामती परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही सफान उज्ज्वल यश संपादन करेल, असा विश्वास त्याच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment