बारामतीत नगरसेवक किशोर मासाळ यांच्या वक्तव्याविरोधात नगरसेवक पदाचा राजीनाम्याची मागणी; नगरसेवकांचे सह्याचे निवेदन सादर.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 8, 2026

बारामतीत नगरसेवक किशोर मासाळ यांच्या वक्तव्याविरोधात नगरसेवक पदाचा राजीनाम्याची मागणी; नगरसेवकांचे सह्याचे निवेदन सादर..

बारामतीत नगरसेवक किशोर मासाळ यांच्या वक्तव्याविरोधात नगरसेवक पदाचा राजीनाम्याची मागणी; नगरसेवकांचे सह्याचे निवेदन सादर..
बारामती :( दि:८)बारामती नगर परिषदेचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांच्याविषयी केलेल्या बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सह्योगी पक्षाच्या नगरसेवक-नगरसेविकांनी त्यांच्या नगरसेवक पदाच्या राजीनाम्याची मागणी करणारे सह्यांचे निवेदन सादर केले.

यावेळी सर्व नगरसेवकांनी सहयोग या निवासस्थानी जाऊन अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांचे ओएसडी सचिन यादव यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

या प्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, गटनेते संजय संघवी, उपगटनेते संपदा चौधर, प्रतोद विशाल हिंगणे, सभापती अमर धुमाळ, नवनाथ बल्लाळ, जयसिंग देशमुख, सविता जाधव, मनीषा चव्हाण तसेच नगरसेवक जय पाटील, विष्णुपंत चौधर, बिरजू मांढरे, अभिजीत चव्हाण, अभिजीत जाधव, अविनाश निकाळजे, अनुप्रिता डांगे-तांबे, रुपाली मलगुंडे, प्रवीण माने, धनश्री बांदल, भारती शेळके, प्रसाद खारतोडे, पूनम चव्हाण, मनिषा बनकर, सारिका वाघमारे, मंगल किर्वे, मंगल जगताप, गोरख पारसे, शर्मिला ढवण, अल्ताफ सय्यद, अश्विनी सातव, राजेंद्र सोनवणे, प्रतिभा खरात, अफ्रिन बागवान, दर्शना तांबे, निलेश इंगुले, सोमनाथ गजाकस, अमोल कावळे, गणेश जोजारे आणि राहुल वाघोलीकर यांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले.

अजितदादा पवार यांच्याविषयी करण्यात आलेले वक्तव्य बारामतीकरांच्या भावना दुखावणारे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त करत निषेध केला. अशा प्रकारच्या अपमानास्पद वक्तव्यांना जनतेकडून कधीही समर्थन मिळणार नाही, तसेच संबंधित नगरसेवकाविरोधात कठोर कारवाई करून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. 

यावेळी सर्व उपस्थितांनी एकमुखाने निषेध व्यक्त करत अजितदादांविषयी आदर व निष्ठा कायम असल्याची भावना व्यक्त केली.

No comments:

Post a Comment