आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीतील सहा आरोपींना अटक करून एक गावठी पिस्टल, जिवंत काडतूस व इतर हत्यारांसह १४,८७,८२०/- रू. किं.चा मुद्देमाल जप्त,गंभीर स्वरूपाचे एकूण २० गुन्हे उघड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 13, 2026

आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीतील सहा आरोपींना अटक करून एक गावठी पिस्टल, जिवंत काडतूस व इतर हत्यारांसह १४,८७,८२०/- रू. किं.चा मुद्देमाल जप्त,गंभीर स्वरूपाचे एकूण २० गुन्हे उघड..

आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीतील सहा आरोपींना अटक करून एक गावठी पिस्टल, जिवंत काडतूस व इतर हत्यारांसह १४,८७,८२०/- रू. किं.चा मुद्देमाल जप्त,गंभीर स्वरूपाचे एकूण २० गुन्हे उघड..
ओतूर :- ओतूर पोलीस ठाणे हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीतील सहा आरोपींना अटक करून एक गावठी पिस्टल, जिवंत काडतूस व इतर हत्यारांसह १४,८७,८२०/- रू. किं.चा मुद्देमाल जप्त, गंभीर स्वरूपाचे एकूण २० गुन्हे उघड झाले असून स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांनी ही कारवाई केली,आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी, डिंगोरे येथील स्थानिक नागरीकांचे विशेष सहकार्य
प्रवरा, जि. अहिल्यानगर येथून चोरीस गेलेली बोलेरो जीप क्र. MH-17-AJ-3075 ही ओतूर पोलीस ठाणे हद्दीत दि.12/07/2026 रोजी सकाळी 09/00 वा. सुगा स कोळवाडी, ता. जुन्नर जि पुणे येथे दिसून आली. सदर वाहनाचा
शोध वाहन मालकाचे नातेवाईक विघ्नेश सुभाष घोलप हे घेत असताना त्यांनी वाहनासह असलेल्या संशयित इसमांना विचारणा केली असता त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी विघ्नेश घोलप यांनी “चोर-चोर" अशी आरडाओरड केल्याने गावकरी घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर गावकरी व आरोपी यांच्यात झटापट होऊन दोन आरोपींना गावकऱ्यांनी पकडले, तर इतर चार आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले, घटनेची माहिती पोलीसांना मिळताच ताबडतोब स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस स्टेशन कडील पोलीस पथकांनी स्थानिक नागरीकाचे मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा
पाठलाग केला, शोध कार्यात सातत्य ठेवून आलमे गावचे डोंगर दरी परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.सदर घटनेच्या अनुषंगाने ओतूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 196/2026 भा. न्या. सं. क. 310(4), 310 (5), सह
आर्म अॅक्ट, 3, 4, 25 म.पो. का. क. 37 (1), 135 प्रमाणे दि. 12/07/2026 रोजी ज्योतीराम तानाजी पवार पो. कॉ. 520 नेम. ओतूर पो स्टे यांनी फिर्याद नोंदविले नंतर वरील प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.सदर घटनेचा प्रकार गंभीर असल्याने ताबडतोब मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल साो. यांना व इतर
वरिष्ठ अधिकारी यांना सुचीत करणेत आली, त्यांचेकडून प्राप्त झालेले आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे उपविभागीय पोलीस
अधिकारी, जुन्नर विभाग श्री. धनंजय पाटील यांनी जुन्नर पो स्टे चे पो. नि. दत्तात्रय गुंड, स्था. गु.शा. चे सपोनि महादेव शेलार, पोसई युवराज जाधव ओतूर पो स्टे यांना तपास पथकासह आरोपींचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना केल्या. आरोपीचे शोधा करीता दोन पथके तयार करून आरोपी ज्या डोंगराचे दिशेने पळून गेले आहेत, त्या दिशेने रवाना केली. पथकाने सलग सुमारे ६ तास आमले गावचे परिसरातील डोंगरभाग, दरी परिसरात स्थानिक नागरीकांचे मदतीने आरोपींचा शोध सुरू ठेवला, आरोपी हे सराईत आणि हत्यारासह असल्याने काळजीपुर्वक तपास करून आरोपी ताब्यात
घेणे आवश्यक होते. त्याकरीता आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी परिसरातील नागरिक तसेच पोलीस पाटील यांच्या मदतीने पळून गेलेल्या चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
सदर गुन्हयाचे कामी एकूण सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे - आरोपी
1) सोनूसिंग कापूरसिंग टाक, वय 30 वर्षे रा. तुळजाभवानी वसाहत, कॅनॉलजवळ, हडपसर, पुणे. 2)जिलूसिंग शेरसिंग दुधानी, वय 40 वर्षे, रा. सह्याद्री हॉस्पीटलचे मागे, खोपोली,शिळफाटा. जि. रायगड, 3)करणसिंग गगनसिंग टाक, वय 27 वर्षे, रा. साकला प्लॉट, परभणी. 4)पंकजसिंग काळुसिंग शिकलगार ऊर्फ
दुधानी, वय 40 वर्षे, रा. गांधीनगर झोपडपट्टी, अंबरनाथ. 5) पापीसिंग उर्फ कृष्णसिंग साहेबसिंग टाक, वय 18 वर्षे, रा. साकला प्लॉट, परभणी. 6) मंगलसिंग मायासिंग दुधानी, वय 58 वर्षे, रा. झरी, जि. परभणी अशी आहेत.
नमुद आरोपी हे सराईत असल्याने त्यांचेकडे चौकशी करून तपास केला असता, त्यांनी खालीप्रमाणे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.विविध ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल असून..
आरोपींकडे सखोल चौकशी केली असता महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील दरोडा, दरोड्याचा प्रयत्न,जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरी असे एकूण 20 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये 02 दरोडे, 01 दरोडा प्रयत्न, 02 जबरी चोरी, 13 घरफोडी व 02 वाहन चोरीचे गुन्हे समाविष्ट आहेत.सदर आरोपींवर यापुर्वी महाराष्ट्रासह तेलंगणा व इतर राज्यांमध्ये ५० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.दरोडयाचे तयारीत असलेले सहा आरोपींना अटक करणेत आलेली असून त्यांना मा. न्यायालयात पोलीस कोठडी रिमांड मिळणेकामी हजर करणेत येणार आहे.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल साो. अप्पर पोलीस अधीक्षकशुभमकुमार, पुणे विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग श्री धनंजय पाटील, प्रमोद
क्षीरसागर, पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, श्री दत्तात्रय गुंड पो. नि. जुन्नर पो.स्टे., महादेव शेलार स. पो. नि. स्था. गु.शा., ज्ञानेश्वर बाजगिरे स.पो.नि. ओतूर पोलीस स्टेशन, युवराज जाधव पोसई ओतूर पोलीस स्टेशन, पोलीस अंमलदार आनंदा भवारी,बाळशिराम भवारी, धनंजय पालवे, सुरेश गेंगजे, दिनेश साबळे, नामदेव कांबळे, नरेंद्र गोराने, देविदास खेडकर, दिपक
साबळे,राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, मपोहवा संगीता मधे, रेश्मा फापाळे, पोशि मनोज राठोड, रोहित बोंबले,ज्योतीराम पवार, सुभाष केदारी, विशाल गोडसे, योगेश उकिर्डे, मपोशी काळे, त्याचप्रमाणे जुन्नर आर. सी. पी पथक
यांनी केली आहे. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी आलमे गावच्या डोंगर परिसरात राबविण्यात आलेल्या शोध मोहीमेत बल्लाळवाडी, आलमे, कोळवाडी, डिंगोरे येथील नागरिक व पोलीस पाटील यांचे मोलाचे सहकार्य
लाभले आहे. गुन्हयाचा पुढील तपास स्था. गु.शा. चे पथक व ओतूर पोलीस स्टेशन करत आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस

No comments:

Post a Comment