जिवंत काडतुस सह धोकादायक गावठी पिस्टल, धारदार कुकरी जप्त व 02 आरोपींना केली तात्काळ अटक..पोलीसांची दमदार कामगिरी. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 9, 2026

जिवंत काडतुस सह धोकादायक गावठी पिस्टल, धारदार कुकरी जप्त व 02 आरोपींना केली तात्काळ अटक..पोलीसांची दमदार कामगिरी.

जिवंत काडतुस सह धोकादायक गावठी पिस्टल, धारदार कुकरी जप्त व 02 आरोपींना केली तात्काळ अटक..पोलीसांची दमदार कामगिरी.
माळेगाव:- माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील मौजे कऱ्हावागज ता.बारामती जि.पुणे या गावचे हद्दीमध्ये इसम नामे गणेश तात्याराम गावडे हा त्याच्या जवळ
एक गावठी पिस्टल व एक जिंवत काडतुस जवळ बाळगुन वावरत असलेबाबतची खात्रीशीर गोपनीय माहीती माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी स.पो.नि.कुलदिप संकपाळ यांना मिळाल्याने त्यांनी त्याबाबत माळेगाव पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कायदेशीर कार्यवाही करणेचे मुफजल आदेश दिल्याने त्या अनुषंगाने काल दिनांक- 08/08/2026 रोजी रात्रौ मौजे क-हावागज येथे रवाना होवून इसम नामे गणेश तात्याराम गावडे याचा गावातील परिसरात शोध घेत असताना तो मौजे माळेगाव खुर्द, ता. बारामती जि.पुणे गावचे हद्दीत माळेगाव ते कऱ्हावागज रोडवरील तुकाई चौक येथिल बंद पत्रा शेडचे गाळयांसमोर असले बाबत गोपनीय माहिती मिळालेने त्या अनुषंगाने मिळाले माहीतीचे अनुषंगाने पोलीस स्टाफ यांनी पंचांसह रात्रौ 20.30 वा. चे सुमारास पाहणी केली असता तेथील बंद पत्रा शेडचे गाळ्यांसमोर एक MH-42-AX 4428 या क्रमांकाच्या NIOS GRAND & 10 चारचाकी वाहनामध्ये एक इसम बसलेला दिसलेने पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्याचे जवळ जावून त्यास गाडीच्या बाहेर येण्यास सांगितले असता त्याने गाडी चालू करून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागलेने त्याची गाडी थांबवून गाडीमधील इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश तात्याराम गावडे वय-20 वर्षे रा. कऱ्हावागज ता.बारामती जि.पुणे असे असल्याचे सांगितले असता त्यावेळी त्यास त्याच्या अंगझडतीचा उद्देश समजावून पंचासमक्ष पोसई साळवे यांनी अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी पिस्टल व मॅगझीनमध्ये एक जिंवत काडतुस व त्याचे गाडीची झडती घेता ड्रायव्हरच्या सीटखाली एक धारदार कुकरी चाकू मिळुन आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे,
1) 30,000/- रू. कि. चा एक सिल्वर रंगाचा गावडी पिस्टल ज्याच्या मॅगझीनच्या वरच्या बाजुस 0.0000 काळया रंगाची पट्टी असलेला लोखंडी अग्निशस्त्र मॅगझीनसह असलेले जु.वा.कि.अं.
2) 300/- रू.कि.ची पितळी 7.65 KF असलेली एक जिंवत काडतुस कि.अं.
3) 500/- रू.कि.चा एक लोखंडी धारदार व टोकदार पाते असलेला कुकरी आकाराचा चाकू पात्याची लांबी 27.2 सें.मी व रूंदी 4.7 सें.मी व लाकडी मुठीची लांबी 12.5 सें.मी असलेला जु.वा.कि....
4) 3,00,000/- रू.कि.ची एक हुंडाई कंपनीची ASTA NIOS GRAND रंगाची तिचा आर.टी.ओ नंबर MH-42-AX 4428 असा व चेसिस नंबर MALB010476 व इंजिन नंबर G4LAKM 379735 असा असलेली जु.वा.कि.अं. 3,30,800/- इसम नामे गणेश तात्याराम गावडे याचेकडे त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या गावठी पिस्टल व जिवंत काडतुस व कुकरी चाकू इ.बाबत विचारपुस केली
असता त्याने सदरचे गावठी पिस्टल व जिवंत काडतुस हे इसम नामे मयुर विष्णु मोरे, रा. मेडद ता.बारामती जि.पुणे याचेकडून खरेदी केले असल्याचे सांगितलेले आहे. तसेच त्याचेकडे सदरचे धोकादायक गावठी पिस्टल, जिवंत काडतुस, व धारदार कुकरी खरेदीचा उद्देश काय आहे? या बाबत विचारणा केली असता त्याने
त्याबाबत सांगण्यास टाळाटाळ केलेली आहे. तरी सदर गुन्हयाचे कामी आरोपी नामे गणेश तात्याराम गावडे वय - 20 वर्षे रा. कऱ्हावागज ता.बारामती जि.पुणे व मयुर विष्णु मोरे, रा. मेडद ता.बारामती जि.पुणे यांचे विरुध्द माळेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं- 150 / 2026 शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 4, 5, 25 सह
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3), 135 अन्वये कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन वरील नमुद दोन्ही आरोपींना सदर गुन्हयाचे कामी अटक करण्यात आलेली आहे. तसेच अटक आरोपींनी नक्की कोणत्या कारणासाठी गावठी पिस्टल खरेदी करण्यात आलेले असुन ते कोणाकडुन खरेदी केलेले आहे
याबाबत अधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी ही श्री.संदिप सिंह गिल्ल. (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, श्री. गणेश बिरादार ,अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, डॉ.श्री.सुदर्शन राठोड . उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी स.पो.नि.
कुलदिप संकपाळ, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, पोलीस नाईक ज्ञानेश्वरर सानप,पोलीस कॉन्टेबल अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे, जयसिंग कचरे यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment