बारामतीत पत्नी व मुलगा बेपत्ता.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 24, 2026

बारामतीत पत्नी व मुलगा बेपत्ता..

   बारामतीत पत्नी व मुलगा बेपत्ता..    बारामती:-खबरी जबाब ता. 30/11/2025 नुसार  अभिमन्यु बाळु ननवरे, वय 31 वर्षे, धंदा - फिरस्ती, सध्या रा.धान्य मार्केटच्या समोर वाबळे हाँस्पीटलच्या जवळ ता.बारामती जि. पुणे मुळ रा. चौगाव बहीरी ता. सटाणा जि. नाशिक समक्ष बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहुन खबरी जबाब देतो की, मी वरील ठिकाणी माझी पत्नी सौ.संगिता वय 32 वर्षे, मुलगा गुरु वय 4 वर्षे, असे आम्ही एकत्रात राहणेस असुन मी व माझी पत्नी सौ. संगिता भिक मागुन कुटूंबाची उपजिवीका करतो.शहर दिनांक 09/11/2025 रोजी संध्याकाळी 05.00 वा.चे सुमारास राहत्या घरी मी व माझी पत्नी सौ. संगिता व मुलगा मिसींग गुरु असे बसलेलो होते पत्नी सौ. संगिता हिला दारु पिण्याचे व्यसन असुन संगिता ही दारु पिण्यासाठी जाते असे सांगुन निघुन गेले जाताना मुलगा गुरु याला सोबत घेवुन गेली त्यानंतर रात्रौ उशीरा पर्यत माझी पत्नी सौ. संगिता अभिमन्यु ननवरे ही घरी न आल्याने ती कोठेतरी बसले असेल म्हणुन मी तिचा त्या दिवशी शोध घेतला नाही त्यानंतर दुस-या दिवशी सकाळी माझी पत्नी व मुलगा घरी न आलेने मी संगिताचा गुरु यांचा बारामती व नातेवाईकांकडे विचारपुस केली परंतु माझी पत्नी व मुलगा कोठेही नसल्याचे समजले त्यामुळे माझी खात्री झाली की, माझी पत्नी सौ.संगिता अभिमन्यु ननवरे वय 32 वर्षे, व मुलगा गुरु वय 4 वर्षे, हा घरात कोणास काहीएक एक न सागंता कोठेतरी निघुन गेले आहे त्यांचे वर्णन पुढील प्रमाणे नाव - पत्नी 1)सौ. संगिता अभिमन्यु ननवरे, वय 35 वर्षे, रा. धान्य मार्केटच्या समोर वाबळे हाँस्पीटलच्या जवळ ता.बारामती जि. पुणे उंची 5 फुट 5 इंच, चेहरा उभा, नाक सरळ, रंगाने काळा, केस काळे बारीक ठेवणीचे,अंगाने मध्यम, नेसणीस लाल रंगाचा साडी, उजव्या हातावर गोंदलेले (नक्की सांगता येत नाही), डावे बाजुचे खुब्यावर जुन्या
जखमीचे खुण,डावे हाताची सर्व नखे काळी आहेत, डोक्यावर नेसणीस काळ्या रंगाचा स्कॉर्प, गळ्यात काळ्या मण्याची पोत,पायात पांढ-या पटटयाची चप्पल, भाषा काटकरी, मराठी, हिंदी, बोलतो.मुलगा 2) गुरु अभिमन्यु ननवरे, वय 4 वर्षे, रा. धान्य मार्केटच्या समोर वाबळे हाँस्पीटलच्या जवळ ता.बारामती जि.पुणे उंची 3 फुट 5 इंच, चेहरा गोल, नाक सरळ, रंगाने निम गोरा, केस काळे बारीक, नाकावर पडलेल्या जखम येणे प्रमाणे वरील वर्णनाचे माझी पत्नी सौ. संगिता अभिमन्यु ननवरे, वय 35 वर्षे, मुलगा सोबत 2) गुरु अभिमन्यु ननवरे, वय 4 वर्षे, रा. धान्य मार्केटच्या समोर वाबळे हाँस्पीटलच्या जवळ ता. बारामती जि. पुणे हे दिनांक 10/11/2025 रोजी संध्याकाळी 05.00 वाचे सुमारास राहत्या घरातुन दारु पिण्यासाठी जाते असे सांगुन कोठेतरी निघुन गेले आहेत. तरी त्यांचा शोध होणेस विनंती आहे.माझा वरील घेतलेला खबरी जबाब मी प्रिंट काढलेनंतर मला वाचुन दाखविला तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर व
खरा आहे.अशी लेखी जवाब बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये दिला असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment