बारामती :-महाराष्ट्राला हादरून टाकणारी धक्कादायक व दुर्दैवी घटनेत राज्य लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले,आजही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरले जाऊ शकत नाही, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला असल्याचे समजत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अजितदादांनंतर पक्षाची धुरा आता खासदार सुनेत्रावहिनी पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.पक्षाच्या प्रमुख नेत्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक आटोपून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्यासह पक्षाचे कोअर कमिटी
सदस्य बारामतीत येणार असून काही वेळात याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पक्षांतर्गत बदलांच्या या प्रक्रियेत सुनेत्रावहिनी पवार यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवले गेल्यास, त्यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबतची माहिती पुढे आलेली नाही. दरम्यान, त्यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता काहीजणांकडून वर्तवली जात आहे.आधी सुनेत्रावहिनी यांची भेट अन् नंतर उपमुख्यमंत्री करण्याबाबतचा प्रस्ताव असून ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे आणि इतरांनी काल रात्री सहयोग बंगला येथे सुनेत्रावहिनी पवार यांची
भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सुनेत्रावहिनी पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मांडला आहे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचं कळतंय.
No comments:
Post a Comment