पुन्हा एखादा.. बारामतीत लाचलुचपत विभागाची कारवाई..
बारामती:- बारामती विकासाच्या दिशेने जात असताना व उपमुख्यमंत्री अजितदादा करोडो रुपये निधी आणत असताना बारामतीत अधिकारी व कर्मचारी मात्र चुकीच्या कामातून लाच स्वरूपात लाखो रुपये कमवित असल्याचे कळतंय, यामुळे दर आठ दिवसातून लाचलुचपत विभागाची झाली तर खऱ्या अर्थाने बारामतीचा विकास झाला असेल असं म्हणता येईल,बारामतीत लाच लुचपत विभागाची कारवाई वारंवार होत असल्याचे पुढे येत आहे, बारामती नगर परिषद मधील 1लाखाची लाच प्रकरण चांगलाच चर्चेचा विषय झाला होता, तर चक्क पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उप निरीक्षक, बारामती तालुका पोलीस यांनी हस्तका मार्फत लाच मागितली असल्याचे तक्रार दाखल करण्यात आली आहे, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार दिनांक 18/3/2025 रोजीच्या तक्रारीचे अनुषंगाने दि. 18/3/2025, दि 19/03/2025, दि 20/03/2025, दि.24/03/2025 रोजी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये माझे विरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल न करणेसाठी सदर गुन्हयात मला अटक न करणेसाठी व गाडी सोडवणेसाठी म्हणुन बारामती तालुका पोलीस
ठाणे येथील जगताप पोलीस व भोसले यांनी माझेकडे सुरवातीला 30,000/- रुपये लाचेची मागणी करुन पडताळणी दरम्यान सुनिल माणिक जगताप, सहायक पोलीस उप निरीक्षक, बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी 15,000/- रु. लाच मागणी करुन तडजोडीअंती 10,000/- रुपये लाच मागणी करुन लाच स्विकारण्याचे
पंचासमक्ष मान्य केले. सदर लाच मागणीस प्रविण भाऊसाहेब भोसले खाजगी इसम यांनी पैसे देणेसाठी अपप्रेरणा देऊन प्रोत्साहन दिले म्हणून त्या दोघांवर कारवाई होणेस विनंती आहे.
माझा वरील फिर्याद जबाब माझे सांगणे प्रमाणे टंकलिखीत करण्यात आला असून तो मी वाचून पाहीला असून बरोबर आहे.असे फिर्यादीत म्हंटले आहे, अद्याप यामध्ये अटक झाली नसल्याचे कळतंय.
No comments:
Post a Comment