जयदादा यांच्या स्मरणशक्तीचे जनतेला आश्चर्य..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 17, 2026

जयदादा यांच्या स्मरणशक्तीचे जनतेला आश्चर्य..!

जयदादा यांच्या स्मरणशक्तीचे जनतेला आश्चर्य..!
बारामती(संतोष जाधव):- उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ जयदादा पवार गावोगावी भेटी देत आहेत.

यापूर्वीही विविध कारणांनी जयदादा या प्रत्येक गावात गेले आहेत. आता गावभेट दौऱ्यानिमित्त पुन्हा जाताना प्रत्येक गावात ते या आधी दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

याआधी या गावात किती वेळा आलो, त्या वेळी गावात कुठे कुठे गेलो, गावात त्यावेळी कोणती विकासकामे सुरू होती, ती आता कोणत्या टप्प्यावर आहेत, याची चौकशी करून त्यावेळी कोण कोण भेटले, असे सांगत अगदी बारीक सारीक तपशिलासह ते जुन्या भेटींना उजाळा देत आहेत. त्यातून दिसून येणारी त्यांची अफाट स्मरणशक्ती जनतेला आश्चर्यचकित करणारी ठरत आहे.

No comments:

Post a Comment