बारामती:- बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय तसेच अनेकांत फार्मसी महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात सुमारे २५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदानाची शपथ घेतली. दोन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग दर्शविला.
निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. बारामती तालुका मतदान प्रचार-प्रसिद्धी प्रमुख सौ. सविता खारतोडे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील नागरिकांची जबाबदारी तसेच मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली.
No comments:
Post a Comment