गुटख्यासह १२ लाखांचा मुद्देमाल पकडला..बारामतीत अशी कारवाई होईल का? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 13, 2025

गुटख्यासह १२ लाखांचा मुद्देमाल पकडला..बारामतीत अशी कारवाई होईल का?

गुटख्यासह १२ लाखांचा मुद्देमाल पकडला..
बारामतीत अशी कारवाई होईल का?
लातूर:-गुटखा बंदी असताना मात्र तो कागदावरच राहिला , आज राजरोसपणे गुटखा सर्वत्र विकताना पहावयास मिळत असले तरी यावर मात्र कारवाई होत नसल्याचे दिसत आहे कुठे तरी एखादी कारवाई होते,पण ती सगळीकडे होती असे नाही, नुकताच चोरट्या मार्गाने कारमधून गुटख्याची वाहतूक करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा आणि औसा येथील पोलिस पथकांनी पकडले असून, त्याच्याकडून कारसह गुटखा असा एकूण १२ लाख ५४ हजार ७०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले, महाराष्ट्रात बंदी असलेला पान मसाला, सुगंधी जर्दा आणि तंबाखूचे ३ हजार ३०० पुडे विक्रीसाठी चोरट्या मार्गाने कारमधून (एम.एच. १२
एस.एल. ५१६०) वाहतूक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेसह औसा येथील ठाण्याच्या पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे मंगळवारी ४ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला.दरम्यान, पोलिसांनी संशयीत कारचा सिनेस्टाईल पाठलाग करत कारसह एकूण १२ लाख ५४ हजार ७०४ रुपायांचा गुटखा जप्त केला. यावेळी एकाला पोलिसांनी मुद्देमालासह पकडले. याबाबत आसिफ महेबूब सय्यद (वय ३८, रा.हाश्मी नगर, औसा) याच्याविरोधात औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राहुल
कांबळे, रियाज सौदागर, अर्जुन राजपूत, नितीन कटारे,सुनील कोव्हाळे, बालाजी चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment