अक्षय भालेराव खून प्रकरणातील तपासाच्या प्रगतीचा अहवाल पोलीस अधिक्षकानीं पाठविला राज्य सचिव वैभव गीते यांना.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 11, 2023

अक्षय भालेराव खून प्रकरणातील तपासाच्या प्रगतीचा अहवाल पोलीस अधिक्षकानीं पाठविला राज्य सचिव वैभव गीते यांना..

अक्षय भालेराव खून प्रकरणातील तपासाच्या प्रगतीचा अहवाल पोलीस अधिक्षकानीं पाठविला राज्य सचिव वैभव गीते यांना..
नांदेड:- अक्षय भालेराव खून प्ररणातील तपासाच्या प्रगतीचा अहवाल नांदेड पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे दिनांक 8 जुलै 20230 रोजी नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांना पाठवला आहे.

1) सखोल तपासाबाबत सूचना देऊन मार्गर्शन केलेले आहे.
2) एट्रोसिटीॲक्टचे  3(2)V हे कलम वाढवले आहे.
3) ॲट्रॉसिटी ॲक्ट बाबत शासनाचे प्रचलित असलेले सर्व परिपत्रकांची व नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
4) नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने एक ते 30 मुद्द्यांचे दिलेले निवेदन आत्मसात करून तपास करण्याचे सूचना तपास अधिकारी यांना दिल्या आहेत.
5) गुन्ह्यात आरोपीतांविरुद्ध मुदतीत दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल करण्याची तजवीज ठेवली आहे.
      असे पत्र नांदेड पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी राज्य सचिव वैभव गिते यांना दिले आहे.
नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे) या संघटनेचे राज्य सचिव यांनी अक्षय भालेराव खून प्रकरणात कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची व विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची घोषणा केली.
वैभव गिते यांनी घोषणा करताच संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष जगदीप दिपके यांनी कार्यकर्त्यांच्या सोबत घटनेच्या पहिल्याच दिवशी घटनास्थळी भेट देऊन 1ते 30 मुद्यांचे निवेदन पोलीस अधिक्षक यांना दिले होते.
दुसऱ्या दिवशी राज्य सचिव वैभव गिते,विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे,विशेष सरकारी वकील प्रेमानंद देडे, ॲड.धम्मदिप बलांडे, जगदीप दीपके,दिलीप आदमाने,संजय माकेगावकर,सोमनाथ ढगे,दलीत दीपके,अनिकेत मोहीते,अजिनाथ राऊत,मोहन दीपके,सुमित साबळे व कार्यकर्त्यांनी,पीडित कुटुंबाची भेट घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गुरव यांच्याशी गुन्ह्याच्या तपासाबाबत निवेदनातील 1 ते 30 मुद्यांवर कारवाई करण्याची विनंती करून नांदेड विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली होती. संघटनेच्या राज्य महिला संघटक पंचशीला कुंभारकर यांनी राष्ट्रीय अनुसचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांची भेट घेऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असता आयोगाने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक नांदेड यांना अहवाल मागितला.त्यानंतर वैभव गिते व कार्यकर्त्यांनी  मंत्रालयात घुसत ॲट्रॉसिटीॲक्ट चे (नोडल ऑफिसर) समन्वय अधिकारी हर्षदीप कांबळे,सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे व गृह विभागाचे प्रधान सचिव  (विशेष) दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन 1ते 30 मुद्यांचे निवेदन सादर केले असता शासनाने एकाच वेळी तीन IAS अधिकारी व तीन IPS अधिकारी यांना कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.शासनाचे पत्र प्राप्त होताच आयुक्त समाजकल्याण पुणे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची विशेष बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल उके,ज्येष्ठ विधज्ञ बी.जी.बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव,बंदिश सोनवणे यांनी नांदेड येथे भालेराव कुटुंबाची भेट घेऊन संघटना शेवटपर्यंत पीडित कुटुंबाच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.
फलटण जी.सातारा व अकलूज जी.सोलापूर येथे पत्रकार परिषदा घेत अक्षय भालेराव खून प्रकरणात  मीडियाची भूमिका व प्रशासनाचा आडमुठेपणा जनतेसमोर मांडला.त्यानंतर वैभव गिते यांनी मंत्रालयात प्रधान सचिव अपील व सुरक्षा यांची भेट घेऊन अक्षय भालेराव खून प्रकरणात वरिष्ठ विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीसाठी चर्चा करून निवेदन सादर केले.
गृह विभागाने पोलीस महासंचालक,पोलीस अधिक्षक यांना विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीसाठी आठ मुद्यांवर अहवाल मागितला आहे.
त्यानंतर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष जगदिप दिपके यांनी पुन्हा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधीकारी यांची भेट घेत भालेराव कुटुंबाचे पुनर्वसन व विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीसाठीचा पाठपुरावा केला आहे.
दिनांक 8जुलै 2023 रोजी नांदेड पोलीस अधिक्षक यांनी तपासाच्या प्रगतीचा अहवाल वैभव गिते यांना पाठवला आहे..

No comments:

Post a Comment