पुणे:-लाच घेणारे पुरवठा अधिकारी यांची अनेक प्रकरणे उघडकीस येतील यासाठी प्रामाणिक कारवाई होणे गरजेचं आहे, लाखो रुपयांची लाच घेऊन रेशनिंगचा काळा बाजार करणार्यांना मोकळे सोडणारे अधिकारी लवकरच रडारवर येथील असं कळतंय, अशीच एक घटना नुकताच घडली याबाबत मिळालेली माहिती नुसार रेशनकार्डच्या शासकीय शुल्काच्या व्यतिरिक्त 19 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 16 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भोसरी अन्नधान्य वितरण विभागाच्या परिमंडळ
अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.'एसीबी' ने ही कारवाई भोसरी (पुणे) येथील अन्नधान्य वितरण कार्यालयात गुरुवारी (ता. 11) दुपारी दोन
वाजण्याच्या सुमारास केली आहे.गजानन अशोकराव देशमुख (वय 36 रा. फ्लॅट नंबर 404
निर्माण हिलसाईड, तळजाई पठार, धनकवडी, पुणे. (वर्ग:- 2) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 25 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार,
तक्रारदार हे अपंग असून समाजकार्य करतात. त्यांना शासकीय कागदपत्रांची माहिती असल्याने ते त्यांचे मित्र व ओळखीच्या लोकांसाठी नवीन रेशन कार्ड काढून देण्यासाठी मदत करत असतात. तक्रारदाराचे मित्र व ओळखीचे असे एकूण 14 जणांनी तक्रारदार यांना त्यांचे
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठीचे अधिकार पत्र दिले होते.तसेच सोबत सरकारी फी प्रत्येकी 50 रुपये असे दिल्यानंतर तक्रारदाराने 14 जणांचे प्रस्ताव तयार करून सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडली होती. शासकीय फी
पन्नास रुपये ऑनलाइन भरल्यानंतर त्या 14 जणांना 14 रेशन कार्ड चे ‘एन' नंबर प्राप्त झाले होते.दरम्यान, तक्रारदार हे सदर 14 नवीन रेशन कार्ड मिळण्याकरिता भोसरी अन्न नागरी पुरवठा विभागाचे चे पुरवठा निरीक्षक देशमुख यांना भेटले. तेव्हा त्यांनी प्रत्येक नवीन रेशन कार्ड साठी 900 रुपये प्रमाणे 14 रेशन कार्डसाठी 12 हजार रुपयांची लाच मागितली होती.
याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक परीमंडळ अधिकारी गजानन देशमुख यांनी तक्रारदार यांच्याकडे 14 रेशन कार्ड मंजूर करून त्यावर सही शिक्का
देण्यासाठी सुरुवातीस 14 रेशन कार्ड पैकी 10 रेशन कार्ड करता, प्रत्येकी 1,500 रुपये प्रमाणे असे एकूण 15 हजार रुपये व उर्वरित चार रेशनकार्डसाठी प्रत्येकी 1 हजार रुपये
प्रमाणे 4 हजार रुपये अशी 19 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून ताडजोडीअंती 16 हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी लोकसेवक गजानन देशमुख यांना तक्रारदार यांच्याकडून 16 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार
प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे करत आहेत.
No comments:
Post a Comment