एक्टिवा 6 जी होंडा कंपनीची मोटरसायकल घेऊन देतो म्हणून अठरा हजार सहाशे रुपयाची फसवणूक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 6, 2023

एक्टिवा 6 जी होंडा कंपनीची मोटरसायकल घेऊन देतो म्हणून अठरा हजार सहाशे रुपयाची फसवणूक..

एक्टिवा 6 जी होंडा कंपनीची मोटरसायकल घेऊन देतो म्हणून अठरा हजार सहाशे रुपयाची फसवणूक..  
बारामती:-बारामती शहर पो स्टे गु र न 665 /2023 भा द वि 420 चा गुन्हा दाखल झाला असून फिर्यादी सौ. कविता प्रवीण जाधव (आशा वर्कर) राहणार आबा गणपती टकार कॉलनी तालुका बारामती यांनी दिलेल्या फिर्यादी वरून श्रीमंत बाबुराव घोडके राहणार कोथरूड पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दिनांक 11/02/2022 रोजी 11:00 वा. ते दि 01/01/2023 रोजी वेळ 01: 00 वा सुमारास घडलेल्या घटनेची माहिती दि. 05/09/2023 रोजी दाखल करून घेण्यात आली याबाबत सविस्तर माहिती अशी की दुर्गा टॉकीज शेजारी आनंद आशा नगर बारामती  बाजूस नमूद तारखेस वेळी व ठिकाणी यातील मजकूर आरोपी याने फिर्यादी व त्याचे इतर सहकारी महिलांची एक्टिवा 6जी होंडा कंपनीची मोटरसायकल घेऊन देतो म्हणून फिर्यादीची अठरा हजार सहाशे रुपयाची फसवणूक केली आहे  वगैरे मजकूर च्या फिर्यादीवरून  अंमलदार पोलीस हवालदार काळे यांनी दाखल करून घेतली तपास अंमलदार - पोलीस नाईक करे करीत असून  पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी-मा पोलीस निरीक्षक तायडे मार्गदर्शन करीत आहे.

No comments:

Post a Comment