बॉडीवर रस्सी व तारेने मोठे दगड बांधुन निघूर्ण खून करून तळ्यात टाकलेल्या इसमाच्या खुनाचा लागला तपास,आरोपी अटक.. बारामती:-बारामती तालुका पोलीस स्टेशन गु र ३१० / २०२३ भा. द.वि. कलम ३०२, २०१ अन्वये दि.२६ / ५ / २०२३ रोजी अनोळखी इसम वय अंदाजे ३० ते ४० वर्षे याचा निघुर्ण खुन करुन पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने त्याचे मयत बॉडीवर रस्सी व तारेने मोठे दगड बांधुन त्यास शिर्सुफळ ता बारामती जि पुणे येथील पाण्याचे
तलावामध्ये फेकुन दिले होते. यावरुन सदरचा गुन्हा दाखल झालेला होता. सदरचा गुन्हा दाखल झालेल्या दिवसापासुन बारामती तालुका पोलीस स्टेशन कडील तपास पथक हे आजुबाजुचे गावामध्ये गुन्हयाची उकल होण्यासाठी अथक प्रयत्न करुन कसोशीने तपास करीत असताना मा. पोलीस निरीक्षक सो बारामती तालुका पोलीस स्टेशन यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे रावणगाव ता दौंड जि पुणे येथील पोपट भानुदास बाराते, त्यांची पत्नी
मुक्ताबाई पोपट बाराते व मुलगा सौरभ पोपट बाराते हे गावातुन गेले ३ महीन्यापुर्वी अचानक गायब झाले होते. त्यानंतर १५ दिवसांनी पोपट बाराते व त्यांची पत्नी मुक्ताबाई बाराते हे रावणगावामध्ये त्यांचे राहते घरी आले परंतु त्यांचा मुलगा सौरभ हा त्यांचे सोबत आलेला नव्हता. त्यानंतर अदयापपर्यंत मुलगा नामे सौरभ हा गावामध्ये आलेला नाही अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने काल दि ३१/८/२०२३ रोजी आम्ही इसम नामे पोपट बाराते याचेकडे त्याचा मुलगा सौरभ व पत्नी सौ मुक्ताबाई यांचे ठावठिकाण्याबाबत विचारपुस करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व मला काही
माहीत नाही माझे पत्नीला विचारा असे सांगीतलेने आम्ही त्यांचे पत्नीबाबत विचारपुस केली असता ती मुलगी नामे निलम खुरंगे रा खुरंगेवाडी ता कर्जत जि अहमदनगर हीचेकडे गेली आहे असे सांगीतले. त्यावेळी आम्ही बाई नामे मुक्ताबाई बाराते हीचा शोध घेणेकामी मा. आनंद भोईटे सोो अपर पोलीस अधिक्षक बारामती यांचे परवानगीने आम्ही स्वतः व तपास पथक असे मौजे खुरंगेवाडी ता कर्जत जि अहमदनगर येथे जावुन बाई नामे सौ मुक्ताबाई पोपट बाते हीचेकडे सखोल चौकशी केली असता तिने सांगीतले की, माझा मुलगा नामे सौरभ पोपट बाराते हा मला दारु पिवुन येवुन मला मारहाण करुन मला व माझे पती पोपट यांना त्रास देत होता म्हणुन मी आमचे गावातील इसम नामे बबलु तानाजी पवार रा रावणगाव ता दौंड जि पुणे यास मुलगा सौरभ पोपट बाराते यास जिवे ठार मारण्यासाठी १ लाख ७५ हजार रुपयेची सुपारी दिली होती. त्यानुसार बबलु पवार याने त्याचे मित्र १) बाबासाहेब उर्फ भाऊ गजानन गाढवे २)अक्षय चंद्रकांत पाडळे असे मिळुन तिघांनी मुलगा नामे सौरभ यास जिवे ठार मारुन त्याची मयत बॉडी शिर्सुफळ येथील तलावमध्ये दगड बांधुन टाकुन दिली आहे. सदर गुन्हयातील आरोपींना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली आहे.सदरची कामगिरी मा श्री अंकीत गोयल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण, मा. श्री आनंद भोईटे ,अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग बारामती, मा. श्री. गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग
बारामती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे बारामती तालुका पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, सहा.फौजदार कल्याण शिंगाडे, पोलीस हवालदार राम कानगुडे, पोलीस हवालदार सुरेश दडस, पोलीस
हवालदार गोदेश्वर पवार, पोलीस हवालदार सदाशिव बंडगर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, दत्तात्रय मदने, शशीकांत दळवी, महेश कळसाईत यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment