पंतप्रधान विश्वकर्मांना योजना स्वयंरोजगारासाठी; कसा करायचा अर्ज अधिक माहिती जाणून घ्या..!
बारामती:-पंतप्रधान विश्वकर्मां योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचली पाहिजे या दृष्टिकोनातून ती किती प्रक्रिया सोपी असते हे जाणून घेण्यासाठी मिळालेली माहितीनुसार स्वयंरोजगारासाठी कोणत्याही एका कौशल्याची
गरज असते. हे कौशल्य उत्तमरित्या हस्तगत केलेली व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते. देशात पंरपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागीर व
शिल्पकारांनी हे सिध्दही केलंय. यामध्ये सुतार, होडी तयार करणारे, शस्त्र बनवणारे,शिंपी, फुलांचे हार बनवणारे, गवंडी, सोनार,कुंभार, चपला-बूट तयार करणारे कारागीर, धोबी,
न्हावी, कुलूप किल्ल्या तयार करणारे, हातोडी व
इतर साधनांचे संच तयार करणारे, मूर्तिकार /
पाथरवट, मासे पकडण्यासाठी वापरली जाणारी
जाळी विणणारे, लोहार, टोपल्या / चटया / झाडू/काथ्या विणणारे, बाहुल्या व इतर पारंपरिक खेळणी तयार करणाऱ्या १८ प्रकारच्या कारागीरांचा समावेश होतो.प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाया कारागिरांना अर्थसाहाय्य करण्यासाठी केंद्र शासनानं प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. यासाठी प्रारंभी १३ हजार कोटींची तरतूद केली आहे. ही योजना सूक्ष्म, लघु, मध्यम
उद्योजकता मंत्रालय, कौशल्यविकास मंत्रालय,
वित्तीय सेवा मंत्रालय व वित्त मंत्रालय संयुक्तरीत्या
राबवतील. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकता मंत्रालय,या योजनेसाठी नोडल एजंसीची भूमिका पार पाडेल. प्रारंभी या योजनेचा कालावधी इ.स.२०२७ - २८ पर्यंत राहील. महिला, अनुसूचीत जाती, -२८ पर्यंत राहील. महिला, अनुसूचीत जाती,जमाती, इतर मागास वर्ग, दिव्यांग, तृतीयपंथी, डोंगराळ प्रदेश व बेटांवर राहणारे अधिवासी अशा घटकांतील कारागिरांना सक्षम करण्याचं मुख्य ध्येय्य ठेवण्यात आलं आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीच्या कालावधीत
लाभार्थ्यांनी जीवनज्योती विमा योजना, सुरक्षा
विमा योजना, अटल निवृत्ती योजना, श्रम योगी
मानधन योजना अशा सारख्या सामाजिक सुरक्षा
योजनांचा लाभ घ्यावा म्हणून प्रोत्साहीत केलं
जाईल.
या योजनेत आतापर्यंत ५१ लाखाहून अधिक
कारागिरांनी अर्ज केला आहे. वेगवेगळ्या
टप्प्यातील चाळणीनंतर १ लाख ४८ हजारांहून
अधिक कारगिरांची नोंदणी आतापावेतो झाली
आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
(१) तीन लाख रुपयांपर्यंत विनाहमी कर्ज, यामध्ये
पहिला हप्ता १ लाख रुपयांचा असेल. त्याची
परतफेड १८ महिन्यात करणं अपेक्षित आहे. दुसरा
हप्ता २ लाख रुपयांचा असेल. त्याची परतफेड ३०
महिन्यात करणं अपेक्षित आहे. व्याजाचा दर पाच
टक्के राहील.(२) १५ हजार रुपये मूल्याचा अवजारांचा संच
मोफत दिला जाईल.
(३) कौशल्याच्या उन्नतीकरणासाठी मोफत
प्रशिक्षण. या कालावधीत प्रत्येक दिवसासाठी ५००
रुपये विद्यावेतन दिलं जाईल. यामध्ये संबधीत
कारागिराच्या कौशल्याची तपासणी केली जाईल.
त्यानुसार त्याला मूलभूत व प्रगत प्रशीक्षणाच्या
सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. हे प्रशीक्षण
गुरु-शिष्य परंपरेच्या पध्दतीनुसार वर्गामध्ये दिलं
जाईल. मूलभूत प्रशिक्षण हे पाच ते सात दिवसांचे
व प्रगत प्रशिक्षण १५ दिवसांचं राहील. प्रशिक्षण
पूर्ण केल्यावर, नॅशनल स्कील क्वालीफिकेशन
फ्रेमवर्क नुसार प्रमाणपत्र दिलं जाईल.
(४) पी.एम. विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र दिलं
जाईल.
(५) ब्रँडींग व जाहिरातीसाठी साहाय्य.
(६) उत्पादनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र
३) डिजिटल आर्थीक व्यवहारांना प्रोत्साहन दिलं
जाईल. त्यासाठी प्रत्येक डिजिटल व्यवहारासाठी १
रुपया याप्रमाणे प्रत्येक महिन्याला १०० डिजिटल
व्यवहारासाठीच्या मर्यादेत हे प्रोत्साहन दिलं जाईल.
या योजनेचा लाभा घेऊ इच्छीणाऱ्या कारागिरांना
https://pmvishwakarma.gov.in या पोर्टलवर नाव नोंदणी करावी लागेल.
आवश्यक कागदपत्रे
(१) आधारकार्ड, (२) रेशनकार्ड, (३) मोबाईल
नंबर, (४) बँक खात्याचं तपशील, (५) रेशनकार्ड
नसल्यास संबधीतास कुटुंबातील सर्व सद्स्यांचे
आधारकार्ड सादर करावे लागतील. (६) बँक खातं
नसल्यास संबधीतास आधी असं खातं उघडावं
लागले. इतर कागदपत्रांची गरज भासल्यास ती
सुध्दा सादर करावी लागतील.
सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ग्रामीण बँका, लघु वित्त
बँक (स्माल फायनांस बँक), सहकारी बँक, सूक्ष्म
वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था (मायक्रो
फायनांस), नॉन बँकिंग फायनांस कंपनी, या
संस्थांमार्फत अर्थसाहाय्य केलं जातं.
पात्रतेच्या अटी
(१) संबधीत कारागीर अथवा शिल्पकाराचं वय
किमान १८ वर्षे असावं, (२) उपरोक्त नमूद १८
पारंपरिक व्यवसायातील असंघटीत क्षेत्रात कार्यरत
अथवा स्वयंरोजगार करणारा असावा, (३) संबंधीत
कारागिराने केंद्र अथवा राज्य शासनाकडून याच
व्यवसायासाठी मुद्रा, पीएम स्वनिधी अशासारख्या
योजनांमधून गेल्या पाच वर्षात अर्थसाहाय्य / कर्ज
घेतलेलं नसावं. विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी केलेल्या दिवसापासूपन तो आपल्या उत्पादनांची
विक्री / व्यापार करणारा असावा. (४) या योजनेचा
लाभ कुटुंबातील एका सदस्यालाच दिला जातो.
कुटुंबाच्या व्याख्येत, पती, पत्नी व अविवाहित मुलं
यांचा समावेश होतो. (५) शासकीय सेवेत
असणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांना या
योजनेचा लाभ घेता येत नाही.अधिक माहितीसाठी
संपर्क (१) ईमेल- dcmsme@nic.in
दूरध्वनी - ०११-२३०६११७६, हेल्पलाईन
१८००२६७७७७७
(२) महाराष्ट्रासाठी संपर्क - प्रधान सचिव, उद्योग,
११४ अनेक्स इमारत, मंत्रालय, मुंबई - ३२.
दूरध्वनी - ०२२-२२०२७२८१,
ईमेल-
prsec.industry.maharashtra.gov.in
No comments:
Post a Comment