युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त प्रमाणपत्र वाटप - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 13, 2024

युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त प्रमाणपत्र वाटप


युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त प्रमाणपत्र वाटप 
बारामती: - पानसरे यांच्या अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश क्लासेस मध्ये राजमाता जिजाऊ जयंती व युवा चेतना दिनानिमित्त यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
वरील कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघ हॉल बारामती येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री योगेश नालंदे संपादक सा. शेतकरी योध्दा, श्री. नानासो साळवे सामाजिक कार्यकर्ते, मा. संतोष तोडकर विभागप्रमुख महिला व बालकल्याण विभाग बारामती नगर परिषद बारामती. मा श्री अजित बनसोडे वकील बारामती जिल्हा सत्र न्यायालय, मा. Adv. झेंडे व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून झाली तसेच मान्यवरांना सत्कार वेळी फुलांची रोपे देऊन हरित संदेश देण्यात आला.
सदर कार्यक्रम अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश क्लासेस चे संचालक श्री प्रकाश पानसरे सर व ट्रेनिंग विभाग प्रमुख सौ ज्योत्स्ना पानसरे मॅडम यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व मासाहेब जिजाऊ यांना अभिवादन करून झाले तसेच उपस्थित  अनेक यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व त्यांना इंग्रजी भाषा शिकल्याने भविष्यातील नोकरीच्या संधीबद्दल मार्गदर्शन श्री नालंदे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सौ सुचिता कर्णेवार व ओमकार दरेकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन कु. मृणाल भोकरे हिने केले. अनेक विद्यार्थ्यांनी क्लास विषयी आपले मनोगत व्यक्त केले व क्लासमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विविध विषयांवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या अशा पद्धतीने मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने युवा चेतना दिन अलकेमिस्ट स्पोकन इंग्लिश मध्ये साजरा करण्यात आला तसेच बारामती नगरपालिका अंतर्गत स्वच्छ बारामती हरित बारामती संदर्भात स्वच्छते विषयी जनजागृती करताना श्री संतोष तोडकर सरांनी विद्यार्थ्यांना व मान्यवरांना हरित शपथ दिली. कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकचा वापर टाळून हरित व निसर्गयोगी वस्तूंचा वापर करण्यात आला व विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश सर्टिफिकेट सोबत स्वच्छते विषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले.

No comments:

Post a Comment