बारामतीतुन सोलापूर जिल्ह्यात परीक्षा देतात हे ऐकलंय ते खरं हायका; शिक्षकाकडून कॉफी पुरवून पास होणं बरं हायका..? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 1, 2024

बारामतीतुन सोलापूर जिल्ह्यात परीक्षा देतात हे ऐकलंय ते खरं हायका; शिक्षकाकडून कॉफी पुरवून पास होणं बरं हायका..?

बारामतीतुन सोलापूर जिल्ह्यात परीक्षा देतात हे ऐकलंय ते खरं हायका; शिक्षकाकडून कॉफी पुरवून पास होणं बरं हायका..?
बारामती:-शिक्षण किती महाग झाले याचा प्रत्यय लक्षात येईल,लाखो रुपये फी घेऊन जर बेकायदेशीर खाजगी कोचिंग क्लास अकॅडमीवाल्यांनी विद्यार्थ्यांना थोडेतरी शिकवले असते,तर आज विद्यार्थ्यांनी स्वतःहून आपल्या बुद्धीच्या क्षमतेवर परीक्षेचा पेपर अभ्यास करून लिहिला असता व चांगले मार्क्स कॉपी न करता स्वतःच्या हिमतीवर पाडले असते पण कॉपी भेटनार नसल्याने विद्यार्थ्यांना पेपर लिहिता येणार नाही,ज्यामुळे पालकांचे टेन्शन वाढले आहे.आता तरी पालकांनो डोळे उघडा कारण खोटी जाहिरात करणारे, परिक्षा वेळी कॉप्या पुरवणारे खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी तुमच्या मुलाचे भविष्य बनवू शकत नाही. कटू पण सत्य आहे.कारण गोरगरीब कुटुंबातील मुलं लाखो, हजारो रुपये खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी ची फी भरू शकत मात्र धनदांडगे मात्र लाखो रुपये भरून मुलांना अश्या शाळेत न जाता अकॅडमीची फी भरून दुसऱ्या जिल्ह्यातील शाळांच्या शिक्षकांना आर्थिक माया पुरवून कॉफी देऊन मुलांना पास करण्याचा सद्या बारामतीत काही क्लासेस,अकॅडमीवाले करीत असल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे, मात्र काही जागृत नागरिक, पालक, विद्यार्थी यांनी याचा भांडाफोड केल्याने प्रकरणे उघडकीस येत आहे, याबाबत लवकरच पोलखोल करणार आहोतच,मात्र अशी कॉफी पुरवून पास करून घेणं हे बरं हायका, हे स्व मनाला प्रश्न विचारावा सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील शाळा, हायस्कूल मध्ये बारामतीचे मुलं परीक्षा देत आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यास लक्षात येईल याबाबत लवकरच मुलाखती प्रकाशित करणार आहोत.नुकताच केलेल्या तक्रारीची दखल घेत पिरले येथील शाळेत(हायस्कूल)येथे कॉफी करताना विद्यार्थ्यांना पकडण्यात आले पण त्यांना सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचं काय?शाळा, हायस्कूल च काय? कॉफी मुक्त परीक्षा का होऊ देत नाही असा सवाल पालक वर्गानी केला असला तरी मात्र यामध्ये काय गौडबंगाल आहे याचे लवकरच उत्तरे मिळतील असो, नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे विभागीय मंडळ,पुणे यांनी लेखी पत्र  1)शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
जिल्हा परिषद, पुणे
2) शिक्षणाधिकारी (प्रार्थमक)
जिल्हा परिषद पुणे
3) शिक्षणाधिकारी (योजना)
जिल्हा परिषद, पुणे यांना दिले की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी) फेब्रु-मार्च २०२४ परीक्षा केंद्रांवर चालणाऱ्या
गैरप्रकारांबाबत तक्रार प्राप्त झाली आहे त्याअनुषंगाने दिनांक २७.०२.२०२४
उपरोक्त विषयानुसार आपणांस कळविण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु-
मार्च २०२४ दि. २१.०२.२०२४ ते दि.१९.०३.२०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. सदर
परीक्षेत सोलापूर जिल्हयातील श्री. सिध्देश्वर पब्लिक स्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज (केंद्र क्र. १७६), अजितदादा
इंग्लिश मिडीयम स्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज, संग्रामनगर,कटफळ, बारामती ( केंद्र क्र. १७७) व दत्तकला
इंटरनॅशनल स्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज, स्वामी चिंचोली, भिगवन (केंद्र क्र. ९९६), या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी विविध माध्यमातून या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत.त्या अनुषंगाने उपरोक्त परीक्षा केंद्रावर विज्ञान शाखेच्या भौतिकशास्त्र (दि. २७.०२.२०२४), रसायनशास्त्र
(दि.२९.०२.२०२४), गणित (दि.०२.०३.२०२४) व जीवशास्त्र (दि.०६.०३.२०२४) विषयांच्या पेपरच्या दिवशी परीक्षा केंद्र तपासणीकरिता भरारी पथक त्वरीत पाठविण्याबाबत नियोजन करावे व सदर केंद्राबाबतचा वस्तुनिष्ठ
अहवाल या कार्यालयास पाठवावा असे पत्र मंजुषा मिसकर विभागीय अध्यक्ष
पुणे विभागीय मंडळ, पुणे ५ यांनी मा. जिल्हाधिकारी, पुणे भरारी पथकाच्या अनुषंगाने उचित कार्यवाहीस्तव तथा माहितीस्तव 
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे भरारी पथकाच्या अनुषंगाने उचित कार्यवाहीस्तव तथा माहितीस्तंव पत्र सादर करण्यात आले,महसूल विभाग व जिल्हापरिषद, पुणे विभाग अंतर्गत नेमण्यात आलेल्या पथकास आवश्यक कार्यवाहीस्तव पत्र सादर केले.पाहूया पुढे काय होतंय.***

No comments:

Post a Comment