भिवंडीतील संकेत भोसले हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई करा;शेरसुहास मित्र मंडळाची मागणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 1, 2024

भिवंडीतील संकेत भोसले हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई करा;शेरसुहास मित्र मंडळाची मागणी

भिवंडीतील संकेत भोसले हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई करा;शेरसुहास मित्र मंडळाची मागणी  
बारामती दि.१: भिवंडी येथील संकेत भोसले या अल्पवयीन युवकाची काही दिवसांपूर्वीच तेथील समाजकंटकांनी किरकोळ कारणावरून निर्घृणपणे हत्या केली होती.याच घटनेच्या निषेधार्थ आज बारामतीतील प्रांत कार्यालात माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेरसुहास मित्र मंडळ आणि समविचारी संघटनांनी एकत्र येऊन बारामतीतील प्रांत कार्यालयात निवेदन दिले.  

भिवंडीतील संकेत भोसले हत्याकांड हे अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी असून शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे.त्यामुळे या हत्याकांडातील दोषी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.तर दुसरीकडे राज्यात अनुसूचीत जाती,जमाती आणि अल्पसंख्यांक समुदायावरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.हि बाब चिंताजनक असून या घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेला आणि सामाजिक सलोख्याला बाधा पोहचत आहे.त्यामुळे अशा घटनांवर कडक पाऊले उचलून राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचं या निवेदनात म्हंटल आहे. 

याप्रसंगी,ॲड.सुशिल अहिवळे,विनोद मोरे,गौतम शिंदे,सिद्धार्थ लोंढे,शुभम अहिवळे,अस्लम तांबोळी,अमित मोरे,विश्वास लोंढे,संतोष जाधव,मनोज केंगार,विशाल घोडके,संतोष यादव,सागर सरोदे,रफिक शेख,अबरार बागवान,वैभव लोंढे,दादासो कडाळे,अभिजित बनकर,राजू खरात,नितीन मोरे,जावेद शेख व आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment