विकसित बारामतीत 'मलिदा गॅंग' सक्रिय..याकडे जाईल का लक्ष? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 29, 2024

विकसित बारामतीत 'मलिदा गॅंग' सक्रिय..याकडे जाईल का लक्ष?

विकसित बारामतीत 'मलिदा गॅंग' सक्रिय..याकडे जाईल का लक्ष?
बारामती:-बारामती हे राज्यात नव्हे देशात गाजत आहे ते येथे होत असलेल्या विकास कामामुळे लोकप्रतिनिधीमुळे आणि त्याचा आम्हा बारामतीकराना सार्थ अभिमान आहे, मोठया प्रमाणात होत असलेला व झपाट्याने होत असलेला विकास पाहता प्रशासकीय यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे पण मात्र या प्रशासकीय यंत्रणेचे अधिकारी फक्त पहाटे आपल्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात दिसत असतील मात्र इतर वेळेस सर्वसामान्य नागरिकांना ते उपलब्ध नसतात साईटवर आहे, तारखा चालुय, मिटिंग चालू आहे अशी वारंवार उत्तरं मात्र ऐकावयास येत असल्याने अनेक बारामतीकरानी नाराजी व्यक्त करताना बोलून  दाखवली जात आहे.यामुळे विकासाची गरज आहेच पण त्याचबरोबर शासकीय यंत्रणा देखील सर्वसामान्य साठी मलिदा(एजंट) मुक्त होणे गरजेचे आहे,अश्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना खऱ्या अर्थाने विकास होतोय हे आपलसं वाटेल कारण भल्या मोठ्या इमारतीत एजंट चा शिरकाव झाल्याने यांच्या मार्फत कोणाला 'मलिदा' पुरविला जातोय हे सर्वज्ञात आहेच पण यावर काय कारवाई होणार आहे का नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे, प्रशासकीय भवन,आरटीओ कार्यालय,पोलीस स्टेशन,रेकॉर्ड रूम,जागा खरेदी विक्री विभाग,पुरवठा विभाग,राज्य उत्पादन शुल्क विभाग,उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालय,पंचायत समिती विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,पाटबंधारे विभाग,पालखी मार्ग, रेल्वे मार्ग अश्या अनेक कार्यलयात नेहमी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले, असे असताना करोडो रुपये खर्च करून भव्य दिव्य इमारती बांधल्या आहे अश्या विकसित बारामतीत शासकीय निमशासकीय कार्यालयातील एजंट गिरी करणारे कुणाला 'मलिदा' पुरवितात हे सगळ्याना माहीत आहे,पण बोलाचीच कडी बोलाचाच भात' अशी म्हणण्याची वेळ आली असली तरी सद्या अश्या 'मलिदा' खाऊ गिरीवर(एजंट वर) कारवाई होणं व ते कुणाचं काम करतात हे पाहणं गरचेच असून खऱ्या अर्थाने बारामती विकसित होत असताना बारामतीकराना आपली कामे करून घेताना 'मलिदा' द्यावा लागणार नाही याची प्रामुख्याने काळजी नेत्यांनी घेणं गरजेचं आहे अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.

No comments:

Post a Comment