बारामती बस स्थानकाचे उद्घाटन होणार भव्यदिव्य..इमारत प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल..प्रत्यक्ष प्रवाशांना दिल्या जाणार्‍या सोई-सुविधांचे काय.? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 29, 2024

बारामती बस स्थानकाचे उद्घाटन होणार भव्यदिव्य..इमारत प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल..प्रत्यक्ष प्रवाशांना दिल्या जाणार्‍या सोई-सुविधांचे काय.?

बारामती बस स्थानकाचे उद्घाटन होणार भव्यदिव्य..इमारत प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल..प्रत्यक्ष प्रवाशांना दिल्या जाणार्‍या सोई-सुविधांचे काय.?
बारामती:-बारामती विकासाच्या दिशेने वाट धरतेय मात्र मात्र कामात व सुविधेत हलगर्जीपणा करतेय..सत्य परिस्थिती लवकरच मांडणार यातील काही महत्त्वाच्या बातम्या.. दिनांक 29/02/2024 मा. विभागीय नियंत्रक, 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ, पुणे व मा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती व मा. आगार व्यवस्थापक, बारामती आगार,बारामती यांना तक्रार करण्यात आली या तक्रारीत रा. प. बस सेवेच्या असुविधेबाबत तक्रार करण्यात आली.बारामतीत मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, मोठे VIP दिग्गज नेते बारामतीमध्ये दाखल होणार आहे,राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाचे उद्घाटन होणार.. भव्यदिव्य ईमारत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार..हे झाले भौतिक सुख...प्रवाशांना प्रत्यक्ष दिल्या जाणार्‍या सोई-सुविधांचे काय...मोडक्या तोडक्या भंगारात जाणार्‍या बस प्रवाशांच्या सोयीसाठी..काय सेवा पुरविता प्रवाशांना..?
आज ग्राहक न्यायालयाच्या कामानिमित्त वेळेवर पोहोचायचे होते, त्यामुळे बारामती ते पुणे विना वाहक विना थांबा.. शिवशाही बस क्रमांक MM 06 BW 0395 या वातानुकूलित फास्ट जाणार्‍या बस ने प्रवास केला.. त्यासाठी जास्तीचे तिकीट दर देवून.. 460/- (दोघांचे )बस नावालाच शिवशाही.. गाडीत कचरा, अस्वच्छ सीट, पडदे कळकटलेले,बस बारामती स्थानकातून 9:00 वा. निघाली पण बस काही 40 - 45 पेक्षा जास्त स्पीड घेत नाही.. हे पाहिल्यावर चालक याना विचारले.. त्यावर त्यांनी सांगितले.. गाडी अशीच चालते भंगाराच आहे,  रस्त्यात कुठे बंद पडेल सांगता येत नाही.. त्यावर बस मधून आगार व्यवस्थापक बारामती तांबे मॅडम यांना फोन करून हकिकत सांगितली... मी बघते असे सांगून फोन कट केला. माझे सहप्रवासी दिलावर तांबोळी यांनी बसचे फोटो त्यांना WhatsApp वर पाठविले.. त्यावर बारामती स्थानकातून शेलार यांचा फोन आला चालक दुसरा आहे रोजचा नाही.. बस जाईल पण थोडा वेळ जास्त लागेल.. अशा फिटनेस नसणार्‍या बस रस्त्यावर का सोडता,  प्रवाशांची किंमत नाही का...MH 06 BW 0395 या बसचे RTO कार्यालयाचे फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे. बस मधील डिजिटल क्लॉक बंद केले,  WiFi बंद आहे,  चार्जिंग पॉईंट बंद आहेत,  अस्वच्छता, पडदे मळलेले कळकटलेले आहेत,  प्रथमोपचार पेटी नाही, बसमधे तक्रार पुस्तक नाही, वातानुकूलित यंत्रणा बंद आहे, बस फिटनेस मध्ये नसल्याने वेळ लागला.  या बस नंतर सुटलेली बस या बस पुढे निघून गेली.  9 वा. सुटलेली बस 12:30 वा. पुणे येथे पोहोचली. या सर्व त्रासामुळे बारामतीमध्ये परिवहनमंत्री यांचा सनदशीर मार्गाने निषेध करावा का असा प्रश्न पडला आहे..?आगार व्यवस्थापक बारामती यांना विनंती याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी व आपण दिलेल्या असुविधेसाठी तिकिटाचे पैसे रक्कम रुपये दोघांचे 460/- व मानसिक त्रासापोटी 5000/- देण्यात यावेत अन्यथा आपल्या विरोधात पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली जाईल याची नोंद घ्यावी. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांना विनंती तत्काळ दोन दिवसात बारामती आगाराच्या बसेसची तपासणी करून फिटनेस नसणार्‍या बसेस वर वायुवेग पथका मार्फत कारवाई करून ताब्यात घेण्यात याव्यात व कार्यवाही अहवाल सादर करावा अन्यथा परिवहनमंत्री यांचा सनदशीर मार्गाने निषेध नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी, या होणार्‍या परिणामास आपणास जबाबदार धरले जाईल असे पत्र तुषार झेंडेपाटील व दिलावर तांबोळी सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद,पुणे यांनी दिले.

No comments:

Post a Comment