पाऊल महिला दिनानिमित्य आधारवड बालरक्षक सप्ताह मधील अलौकीक कार्य करणाऱ्या बालरक्षक भगिनीचा भावस्पर्श.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 5, 2024

पाऊल महिला दिनानिमित्य आधारवड बालरक्षक सप्ताह मधील अलौकीक कार्य करणाऱ्या बालरक्षक भगिनीचा भावस्पर्श..

पाऊल महिला दिनानिमित्य आधारवड बालरक्षक सप्ताह मधील अलौकीक कार्य करणाऱ्या बालरक्षक भगिनीचा भावस्पर्श..
पुणे (प्रतिनिधी) :- ८ मार्च जागतिक महिला दिनाचे आपले काम आणि आपण यामध्ये समन्वय असलाच पाहिजे आणि कामामुळेच आपली ओळख झाली पाहिजे म्हणून आपल्याला आलेले काम अतिशय प्रामाणिकपणे पार पाडावे या उद्देशाने कार्य करणाऱ्या सहसंचालक SCERT पुणे डॉ . शोभा खंदारे यांचा प्रवास विद्यार्थ्याचा हितासाठी झोकून देणारा आहे. मुलांमुलीमध्ये भेदभाव न करणाऱ्या खंदारे परिवारात जन्म झालेल्या डॉ.शोभा खंदारे मॅमचा सासरही समानतेवर भर देणारा मिळाला . नांदेड येथे डायट मध्ये काम करतांना मुलांना येणाऱ्या समस्येवर त्यांनी आपली भूमिका प्रखरपणे मांडली आणि मुली व मुले दोघेही समान आहे त्यामुळे मुलीनी आपली क्षमता विकसित करून आपण कुणापेक्षाही कमी नाही या उद्देशाने काम करण्याचे अव्हाहन दिले. २०१७ पासून नंदकुमार यांनी 'बालरक्षक ' ही संकल्पना मांडली . हे काम समता विभागाचे असल्यामुळे शाळाबाहय मुलांना न्याय देण्याची जबाबदारी त्यावेळेस उपसंचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शोभा खंदारे मॅडमनी अतिशय सुंदररित्या पार पाडली . त्यांनी बालरक्षकाची योग्यरित्या बांधणी करण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शाळाबाह्य मुलांसाठी कामकरणाऱ्या बालरक्षकांना एकत्र जोडले . प्रशिक्षणाचे आयोजन करून मार्गदर्शन केले विविध उपाय योजले परिणाम महाराष्ट्रातील संपूर्ण टिम कामाला लागली आणि बालरक्षकाच्या मदतीने शाळाबाहयचा आकडा हा शुन्याकडे येवू लागला . प्रत्येक बालरक्षक येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी उच्च पदावर असणाऱ्या उपसंचालकाना कॉल करू लागला . नंदूरबार जिल्ह्यातील विविध भागाना भेट देवून मुलांच्या शाळाबाहय होण्याचे कारण शोधून त्यावर उपाय केले आढावा घेतला मुले शाळेत येवू लागली व शिकू लागली .
अधिकारी म्हटलं की काही बंधने असतात पण याहीपलिकडे माणुस पण जपणारे अधिकारी शिक्षण विभागाला क्वचित मिळतात . बालरक्षकाच्या कामानिमित्य आदरणीय शोभा मॅमशी ओळख झाली . मॅम उपसंचालक म्हणून समता विभाग पुणे येथे कार्यरत आहेत .मी इतरासोबत काम करीत होतो आणि सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे मॅम कार्यालयात आल्यात आणि सरळ स्वताच्या कॅबीनमध्ये न जाता नुतन मॅम सोबत , अनुराधा मॅम सोबत , स्नेहल मॅम शी अनेक समस्या विषयी बोलत होत्या, मला वाटलं की आम्हासारखे कोणीतरी असेल पण जोशी सरांनी म्हटले की , "उपसंचालक मॅम आहेत त्या " . मला नवल वाटले एखादया ऑफीसचा साधा सहाय्यक स्वतःला अधिकाऱ्यासारखा मिरवितो आणि येथे अधिकारीच सर्वांशी सहज वागतो . समतेची खरी ओळख समता विभागाच्या या अवलिया अधिकाऱ्याकडून अनुभवायला मिळाले . काम होत राहतात आणि ते सर्व जण कमी जास्त प्रमाणात प्रत्येकजन करीत असतो पण सोबतचा व्यक्ती आपुलकीची वागवणुक देत असेल तर काम दुपटीने होते आणि त्याव्यक्तीविषयी आदर मनातुन निर्माण होते अशाच आम्हाला प्रेरणा देणाऱ्या , नेहमी प्रोत्साहित करणाऱ्या डॉ . खंडारे मॅम काही वेगळ्याच !
  काम करणाऱ्या शिक्षकांची पाठराखण आणि त्याला इष्ट ते स्थान देण्यात क्षणाचाही विलंब करीत नाही . मला बालरक्षक म्हणून काम करताना अनेक अडचणी येतात त्यावेळेस मी क्षिरसागर साहेबांना कॉलही करतो त्यावेळेस साहेब म्हणतात काळजी करू नका आपल्या सर्वांच्या कामाला बळ देण्यास आदरणीय खंडारे मॅम आहेत . नकळत एक ताकद येते आणि हातून चांगली कृती घडते .
   वर्धा वारीपुर्वी माझ्याघरी दुःखाचा पहाड कोसळला होता .सहा सात वाजले असेल मॅम वारीला आल्या होत्या मला पाहताच जवळ बोलवून संपूर्ण दुःखाचे कारण जाणून घेतले . अधिकारी काय असते आम्हा माहित आहे पण माझ्या दुःखावर सांत्वन करतांना जणू माझी आई मला नव्या ताकदीने उभं राहण्याची हिम्मत देत असल्याचा भास झाला .हे तेव्हाच घडू शकते खुर्चीवर बसणारा अधिकारी मानवतेचा उचांक गाठलेला असतो . असाच उंच्चाक डॉ. खंडारे मॅमनी गाठलेला आहे म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक बालरक्षक मॅमचा प्रत्येक शब्दाचा मान राखून स्वताला कामात झोकून देतो .आदरणीय डॉ शोभा खंडारे मॅम ला 'सर ' सोलापूर येथील हा बहूमान समजला जाणारा सर फॉउंडेशनचा पुरस्कार देण्यात आला . त्याचबरोबर त्यांना बालरक्षक चळवळीचा " आधारवड " हा बहुमान महाराष्ट्रातील बालरक्षकांनी दिला .
उपसंचालक पदानंतर त्यानी डॉयट पुणे येथे प्राचार्याचा कार्यभार सांभाळला . तत्पुर्वी कोरोना भारतात थैमान घातला होता .शाळा ठप्प आता जिम्मेदारी येवून पडली होती बालरक्षकांची कारण कुठे कुठे मुले अडकल्या गेली होती शिक्षण बंद होते त्यावेळेस डॉ.शोभा खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो बालरक्षकांनी मुलांना प्रत्यक्ष चावडीमध्ये , मोहला वर्ग , कोरोनाचे सर्व नियम पाळून शिक्षण सुरू केले याबाबत तात्कालीन शिक्षण आयुक्तानी मॅडमसोबत सर्वच बालरक्षकांची प्रशंसा केली . सर्वच बालरक्षकांना आपले काम मांडता यावे म्हणून एकाहत्तर बालरक्षकांच्या ऑनलाईन यशोगाथा प्रकाशित करून बालरक्षकांचे कार्य महाराष्ट्रासमोर मांडले . बालरक्षकांचा सन्मान केला . साहेबांच्या मदतीने एक गाव एक बालरक्षक ही संकल्पना मांडली . उददेश एकच गावात एकही मुल शाळाबाह्य राहू नये .
    कधी कधी मिळालेल्या बहूमानाला धन्य वाटते आणि त्या पुरस्काराचा मानही उंचावतो कारण तो ज्याच्या पदरी पडतो आहे त्यांच काम त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो अशाच प्रकारे या पुरस्काराचा मान निश्चितच उंचावल्या गेला आहे . पुरस्कार जरी अनेक मिळाले परंतु माणुसकी जपणे हाच खरा धर्म आहे हेच विचार मनात रुजवून त्या आपल्या कामाने सर्व बालरक्षक शिक्षकांना मार्गदर्शन करीत आहे . त्या प्रत्येक बालरक्षकाच्या अतिशय जवळ असतात आधारवड म्हणून आईप्रमाणे सर्वांना सांभाळतात त्याचे प्रत्यय मला नव्हे तर अनेकांना आला. माझे हिप्स रिप्लेसमेंट झाले . आपरेशन झाल्यानंतर मॅमचा कॉल आला कसा आहेस ' त्यांनी तब्बेतीबाबत विचारपुस केली आणि परिस्थितीबाबतही .. बोलणे झाले आणि फोन ठेवल्याबरोबर माझ्या खात्यात मॅमनी पैसे पाठवले होते त्यांना माहित होते की मी अडचणीत असेल , हे फक्त मोजके लोकच ओळखतात बालरक्षकाना प्रत्येक संकटांत मदत करणाऱ्या आधारवड डॉ. शोभाताई खंदारे यांची मुलाखत घेतांना मन भरून आले . त्यांचा अधिव्याख्याता ते सहसंचालक पर्यंतचा प्रवास पण प्रत्येकाला माणुस म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन त्यांना काही वेगळेच बनविते .

   विनोद राठोड बालरक्षक: बालरक्षकांना काम जोमाने करण्यासाठी व नवीन प्रेरणा मिळण्यासाठी आपण कोणते प्रयत्न कराल ?
"जे बालरक्षक सकारात्मक गतीने पुढे जात आहे अशा बाल रक्षकांना सन्मानित करून अनेक बालरक्षक हिरहिरीने समोर आणणे हा प्रयत्न आहे " .
: बालरक्षक चवळीच्या आपण आधारड आहात ही चळवळ घराघरापर्यत पोहचण्यासाठी आपले काय नियोजन असेल ?
"महाराष्ट्रात ज्या ज्या बालरक्षकांनी उत्तम कामगिरी केलेली आहे यांना एक व्यासपीठ देण्याचा आपला प्रयत्न आहे " .
: आपण सर्वच बालरक्षकाना एक समान मानता ही प्रेरणा कोठून मिळाली ?
"पुढच्या पिढीसाठी कुटुंबातूनच महिलांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे हे संस्कार असले पाहिजे 
स्त्री पुरुष समानता हे संस्कार कुटुंबातूनच येत असतात
 मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ आता हा बदल करण्यात येत नाही हा अनुभव घरापासूनच आलेला आहे माहेर आणि सासर एक आहे हेच मी एक महिला म्हणून मला जाणवत आहे " .
: बालरक्षक चळवळ आपण उभी केली पण आता थोडयाच दिवसात आपण सेवानिवृत्त होणार आहात , बालरक्षक म्हणून पुढे आपली काय भुमिका असेल ?
"सेवानिवृत्त झाल्यावर बाल लक्ष चळवळीच्या नेतृत्व कायमच असेल माझ्या शासकीय अनुभवाचा आणि बाल रक्षक नेतृत्वाचा सांगड घालून बालरक्षक या चळवळीला पोषक वातावरण देण्याचे कार्य करत राहील .
काहीच महिन्यात मी सेवानिवृत्त होते आहे जिल्हा परिषद शाळेची आणखी प्रगती होण्यासाठी काम बाकी आहे असं वाटतं .
आता या जनरेशन मध्ये महिला सक्षम आहेत शिकत आहेत नोकरी करत आहेत फक्त जबाबदारीने राहणं गरजेचं आहे परिस्थितीनुसार वर्तणूक योग्य असावी. "
      आपली सेवाभावी वृत्ती असीच रहावी आणि आपण सदैव बालरक्षकाच्या पाठीशी उभ्या राहाव्यात याच उद्देशाने आपणास जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो व आपल्या कार्याला मानाचा मुजरा करतो .
        विनोद राठोड
    बालरक्षक टिम महाराष्ट्र

No comments:

Post a Comment