वर्दीच्या आड एका पोलिसांन विद्यार्थिनीवर केला वारंवार बलात्कार..
ठाणे :-रक्षकच भक्षक बनत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे अशीच एक घटना नुकताच घडली, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातल्या एका पोलिसामुळे खाकी
वर्दीला बदनामीचं गालबोट लागलं आहे. अंगावर
खाकी परिधान करणं म्हणजे समाजाला सुरक्षेची भावना निर्माण करून देणं आणि त्यांची सुरक्षा हा वर्दीतल्या माणसाचा सेवाभाव असतो; मात्र एखाद्या व्यक्तीमुळं या वर्दीलाच गालबोट लागू शकतं, हे दाखवून देणारी घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. वर्दीच्या आड एका पोलिसानं विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना
घडली आहे आणि याबद्दल कोणाकडे वाच्यता केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही त्यानं तिला दिल्याचं आता उघड झालं आहे. पीडित मुलीने स्वतः पुढे येऊन धाडसाने या प्रकरणाची तक्रार केली आहे. ठाणे जिल्ह्याअंतर्गत ठाणे शहर पोलिस स्थानकात ही
तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पीटीआयला सविस्तर दिली. त्यांनी सांगितलं, की ठाण्यातल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी एका पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
ठाणे पोलीस स्थानकातल्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, आदल्या दिवशी या मुलीनं तक्रार दाखल केली आणि त्याची दखल घेऊन तातडीनं 28 वर्षीय पोलीस कर्मचारी याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतल्या माहितीनुसार, मागच्या वर्षी 10 ते 31 डिसेंबर या काळात आरोपी अजय याने पीडित मुलीशी मैत्री केली आणि मग शहरातल्या वेगवेगळ्या लॉजवर तिला नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे.
पीडित मुलीनं तक्रारीत म्हटलं आहे, की आरोपी तिला वारंवार धमकी देत होता. यासंदर्भात कोणाकडे वाच्यता केल्यास, त्याचे परिणाम गंभीर असतील, अशी धमकी देत होता. त्यामुळं मुलगी घाबरली होती; मात्र हे प्रकरण वाढत
चालल्याचं लक्षात येताच तिने पोलिसात येऊन घडलेला प्रसंग सांगितला आणि रीतसर एफआयआर देखील दाखल केला असून अधिक तपास चालू आहे.
No comments:
Post a Comment