कत्तल केलेल्या म्हैशीची कातडी विना परवाना वाहतुक करीत असताना पोलिसांची कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 13, 2024

कत्तल केलेल्या म्हैशीची कातडी विना परवाना वाहतुक करीत असताना पोलिसांची कारवाई..

कत्तल केलेल्या म्हैशीची कातडी विना परवाना वाहतुक करीत असताना पोलिसांची कारवाई..
वडगाव निंबाळकर:-वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे को-हाळे बु ता बारामती याठिकाणी कातडी घेऊन जाणाऱ्या वाहन पकडून पोलीस स्टेशनमध्ये  दिपक नंदकुमार शिरतोडे वय-24 व्यवसाय-शेती रा. को-हाळे यांनी फिर्याद दिली,यामध्ये आऱोपी- 1) प्रशांत प्रफुल्ल पडकर वय-25 रा. सुहासनगर बारामती ता. बारामती जि. पुणे 2) मोहन महादेव पोळ वय-45रा.निपाणी ता. निपाणी जि. बेळगांव राज्य कर्नाटक 3) अरुण रामचंद्र व्हटकर रा. जवाहनगर इंदापुर रोड बारामती ता. बारामती जि.पुणे यांच्या वर गु र नं  221/2024  भा.द वि कलम 429 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 6 व 9 प्रमाणे दाखल झाला असून याबाबत मिळालेली माहितीनुसार  दि.13/04/2024 रोजी रात्री 09/15  वा चे सुमारास मौजे को-हाळे बु ता बारामती जि. पुणे गावातील बस स्टॅण्ड समोर आरोपी मजकुर यानी 1व 2 यांनी आपले ताब्यातील एक अशोक लेलंड कंपनीचा दोस्त टेम्पो नंबर एम.एच. 42.बि.एफ. 2752 मधुन कोणताही परवाना नसताना कत्तल केलेल्या म्हैशीची कातडी विना परवाना वाहतुक करीत असताना मिळुन आला तसेच ति म्हैशीची कातडे त्यांनी आरोपी क्र 3 यांचेकडुन आणले आहेत.वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हायाचा प्रथमवर्ग रिपोर्ट मा.जे.एम.एफ .सी सो,कोर्ट बारामती याच्या कोर्टात रवाना केला असुन गुन्हयाचा पुढील तपास स फौ फणसे  हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment