हादरवणारी घटना..दुहेरी हत्याकांड,पत्नी,मुलाच्या खुनानंतर युवकाने केली आत्महत्या
नागपूर: - खुनाचे प्रमाण वाढत असून आर्थिक व्यवहार तर कुठे अनैतिक संबंध यातून खून, हत्या, खुनाचा प्रयत्न असले प्रकार खूप वाढत आहे, रोज या बातम्या प्रसिद्ध होत असून नुकताच हादरवणारी घटना घडली दुसऱ्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याने
तिला ओयो हॉटेलमध्ये बोलवून अडीच वर्षांच्या
मुलासह पत्नीचा खून करीत युवकाने स्वतः ही आत्महत्या स्वतःही केली. ही धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या
हद्दीतील गजानननगर परिसरात असलेल्या 'गोल्डन की ओयो हॉटेल' येथे उघडकीस आली.या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली.सचिन राऊत (वय ३१, रा. दिनननगर इसासनी), नाजनिन सचिन राऊत (वय ३०, एकात्मतानगर) आणि युग राऊत अशी मृतांची नावे आहेत. सचिनला रुक्मिणी नावाची
पहिली पत्नी असून तिच्याकडून त्याला दोन मुले आहेत. तो ड्रायव्हर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन २०२२ ला मध्यप्रदेशात एका नातेवाईकाच्या लग्नात गेला असताना त्याची आणि नाजनिन यांची भेट होऊन
एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याने तिच्याशी लग्न केले.ही बाब पहिल्या पत्नीलाही माहिती नव्हती. तो तिला नेहमी भेटण्यासाठी मध्यप्रदेशात जायचा. त्यानंतर ती इथेच येऊन राहू लागली. त्यामुळे ही बाब पहिल्या पत्नीचा निदर्शनास
आली. तिने त्याला विचारणा केली असता, त्याने होकार दिला. तेव्हापासून दोघांत सातत्याने भांडणे होऊ लागली.यामुळे तो संतापला होता. दरम्यान दोन महिन्यांपासून नाजनिनही त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे त्याने माहिती काढली असता, तिचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याची कुणकुण त्याला लागली. त्यामुळे तो चिडला. त्याने तिला संपविण्याचा
निर्णय घेतला. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याने नाजनिनला भेटण्यासाठी गोल्डन किंग ओयो हॉटेलमध्ये बोलाविले. त्याने हॉटेलमधील चार तासासाठी खोली बुक केली होती.ती चिमुकल्या यशसोबत १२ वाजताच्या सुमारास तिथे आली. यादरम्यान सचिनने चिमुकल्याला ज्युसमधून विष दिले आणि नाजनिनच्या डोक्यात हातोडा मारून तिला ठार
केले. त्यानंतर रुममध्ये फाशी घेत, त्याने स्वतःलाही संपविले. सहा वाजताच्या सुमारास समोरच्या इमारतीतल्या व्यक्तीला सचिनने फाशी घेतल्याचे दिसले. त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना कळवले.त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रविण काळे यांना माहिती दिली. त्यांना ताफ्यासह दाखल होत, दार तोडून खोलीत प्रवेश केला. पंचनामा करीत, तिन्ही मृतदेह मेडिकल येथे उत्तरीय तपासासाठी
पाठविली. दरम्यान पोलिसांनी खून आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.पोलिसांना हॉटेलच्या रुममध्ये अडीच वर्षांच्या यशच्या तोंडातून फेस निघाल्याचे दिसले. दरम्यान रुमची तपासणी केली असता, त्यांना करारनामाही आढळला. त्यामध्ये त्याने
नाजनिनशी संबंध तोडत असल्याचे सांगून यानंतर यशच्या पालनपोषणाची जबाबदारीही नाजनिनवर टाकल्याचे नमूद केले होते. त्यामुळे सचिन नाजनिनशी संबंध तोडण्याच्या
हेतूनेच तिथे आल्याची चर्चा परिसरात रंगली होती.
No comments:
Post a Comment