*स्व.अजितदादा पवार यांच्या विकास कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत...*
*मा.सुनेत्राताई पवार यांना बारामती तांबोळी (जमात) बांधवांचा जाहीर पाठिंबा..
बारामती :-आदरणीय स्व. अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातानंतर दुखःद निधन झाले संपूर्ण महाराष्ट्रसह बारामतीच्या विकासाची धमक असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले...
आणि पवार कुटुंबियासह संबंध महाराष्ट्र व बारामतीकर यांच्यावर एकच शोककळा पसरली....
आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले एक उमदे स्पष्टवक्ते, प्रसंगी कणखर व्यक्तिमत्त्व तसेच निखळ विनोदशैली व प्रेमळ असलेले दादा आपल्यातून निघून गेले हि गोष्ट बारामतीकर नागरिक व मतदार म्हणून कोणालाच मान्य होत नव्हती...
परंतु नियतीच्या पुढे कोणाच काहीच चालत नाही...
परंतु बारामतीचा रस्ता, फुटपाथ, प्रशासकीय इमारती, रेल्वे स्टेशन, गार्डन, शाळा कॉलेज, शासकीय दवाखाने, शहरातील , तलाव, कॅनॉल , प्रत्येक ठिकाणची स्वच्छता बारामती शहरतील प्रत्येक हिरवगार झाड 🌲 अजितदादांचा श्वास बनुन मी तुमच्या सोबत आहे यांची जणू अजितदादा आपल्या साक्षच देत आहेत...
जो माणूस फक्त माझी बारामती व मी बारामती करांचा म्हणून सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत घेऊन देशातील एक अगळेवेगळे स्वप्नातील सुंदर असे शहर निर्माण केले...
ते निर्माण करत असताना विविध समाजाची धार्मिक स्थळे, मंदिरे, मस्जिद, दर्गा, बौद्ध विहार, चर्च, गुरुद्वारा, समाज मंदिरे, अगदी स्मशानभूमी, दफनभुमी, दहाव्याचे घाट सुध्दा सुशोभीकरण करून
त्याच्या निर्माणासाठी विविध मार्गांनी निधी उपलब्ध करून दिला... तसेच अठरा-पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन सामाजिक न्याय देऊन विश्वासाचे राजकारण केले कधीही धर्माच्या आणि जातीच्या नावावर मतदान मागितले नाही..
किंवा द्वेषाचे- तुष्टीकरणाचे राजकारण केले नाही
केले ते फक्त आपल्या कामाच्या जोरावर.. मी कामाचा माणूस आहे आणि मला कामाचा माणूस म्हणून मत द्या असे म्हणणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत..त्यांची किंमत आज सगळ्यांना कळत आहे..
म्हणतात ना कि मरावे परी किर्ती रूपी उरावे...
आज ते आपल्यात हायत नसताना त्यांच्या अपघाती निधनानंतर होऊ घातलेल्या विधानसभा पोटनिवडणूकीत स्व.अजितदादाच्यां अपुर्ण राहीलेल्या विकासकांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी व त्यांचे बारामतीकर नागरिक म्हणून असलेले ऋण फेडण्यासाठी समाज घटक म्हणून बारामती तांबोळी जमात अध्यक्ष,पदाधिकारी,समाजबांधव यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर करत व देत त्यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे...
*हिच खरी स्व. अजितदादा पवार यांना आमच्याकडून श्रद्धांजली राहील.....*p
*आपल एक एक अम्यूल मत हे अजितदादाच्या अपूर्ण राहिलेल्या विकासासाठी फक्त सुनेत्राताई पवार यांनाच...*
*शब्दांकन...* ✒️
मुनिर तांबोळी
बारामती तांबोळी जमात
अध्यक्ष बारामती
मो...९८९०३६२९८६....
No comments:
Post a Comment