महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त लिंगायत समाजा तर्फे सामाजिक उपक्रम म्हणून भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 19, 2026

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त लिंगायत समाजा तर्फे सामाजिक उपक्रम म्हणून भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन..

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त लिंगायत समाजा तर्फे सामाजिक उपक्रम म्हणून भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन..
   बारामती:- १९ एप्रिल महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त लिंगायत समाजा कडून महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि आरोग्य शिबिराची सुरवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली या शिबिरा मध्ये 
   • मुक्ताई हॉस्पिटल डॉ मिनल गवसणे यांच्या माध्यमातून स्किन चेकअप 
• बारामती हॉस्पिटल च्या माध्यमातून बी पी शुगर ऑक्सिजन आणि ईसीजी तपासणी 
• ⁠एच वी देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी तसेच मोफत मोतीबिंदू / काचबिंदू ऑपरेशन आणि अल्प दरामध्ये चष्मे वाटप 
• ⁠शिवम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वेळापूर यांच्या माध्यमातून हारणीया , अपेंडिक्स, मुथखडा 
वरील सर्व तपासणी करण्यात आल्या बारामती शहर PI श्रीशैल्य चिवडशेट्टी व सौ ची वडशेट्टी , नगरसेवक यशपाल जी पोटे, सौ अनुप्रीता ताबे ( डांगे) , माझी जेष्ठ नगर सेवक श्री सुभाष आप्पा ढोले इ कार्यक्रमास प्रमुख उपस्थित होते 
   या कार्यक्रमा मध्ये १०० समाज बांधवांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला तसेच देसाई हॉस्पिटल यांच्या तपासणी मध्ये ३ मोती बिंदू पेशंट ची शस्त्रक्रिया फ्री करण्याचे निदर्शनास आले तसेच २ मुळव्याद शस्त्रक्रिया मोफत करण्याचे निदर्शनास आले 
      तसेच डॉ मीनल गवसने यांनी आपल्या समाज बांधवान साठी दि १० मे ते २० मे पर्यंत मोफत कन्सल्टिंग करनार असल्याचे आव्हाहन केले 
      महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पूजा पाठाचा कार्यक्रम घेण्यात आला या नंतर महात्मा बसवेश्वर सर्कल येथे पुष्पहार अर्पण करण्यात आला या वेळी समाजाचे अध्यक्ष श्री समीर ढोले, सौ माधुरी झाडबुके, सौ हेमा बोधे व विश्वस्थ मंडळ तसेच महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीचे रोहित पिल्ले, अभिषेक ढोले, विजय गाढवे, ऋषिकेश भुंजे, सचिन शाहीर, एड.अमित ढोले , तनिष्क ढोले यां सहित सर्व बसवप्रेमी समाज बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment