देशवासियांना बनविलेल्या वस्तू खरेदी करून दिवाळी साजर करावी : चैतन्य कदम - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 1, 2026

देशवासियांना बनविलेल्या वस्तू खरेदी करून दिवाळी साजर करावी : चैतन्य कदम

देशवासियांना बनविलेल्या वस्तू खरेदी करून दिवाळी साजरी करावी : चैतन्य कदम 
जिजाऊ सेवा संघाच्या वतीने महिलांच्या वस्तुंना बाजारपेठ 

बारामती: - महिला व बचतगटांनी बनविलेल्या वस्तुंना हक्काची बाजारपेठ मिळावी त्यांना आर्थिक सक्षमीकरण होणे साठी जिजाऊ व्यासपीठ महत्वाचे असून देशवासियांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करून दिवाळी साजरी केल्यास कारागीर व बनविणाऱ्यांचा उत्साह वाढेल असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी केले.

बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने दिवाळी फेस्टवील प्रदर्शन  चे उदघाटन करताना चैतन्य कदम बोलत होते या प्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव, तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किशोर माने,नगरसेवक नवनाथ बल्लाळ, प्रवीण माने व ऍड वृषाल भोसले, पांडुरंग चौधर, जयश्री सातव, छाया कदम ,डॉ सुहासिनी सातव ,मराठा सेवा संघ चे प्रदीप शिंदे, बारामती बँक उपाध्यक्ष देवेंद्र शिर्के,आदी मान्यवर उपस्तीत होते.

महिलांनी दिवाळी साठी बनवलेल्या वस्तू ,महिलांनी मिळवून दिलेली बाजारपेठ या मुळे महिला आर्थिक नियोजन उत्तम करत असल्याने जिजाऊ सेवा संघाचे कार्य उत्तम व कौतुकास्पद असल्याचे सचिन सातव यांनी सांगितले.

शहरी व ग्रामीण भागातील गृहणी, व्यवसायिक,नौकरी करणाऱ्या महिलांना विविध वस्तू विक्री व खरेदी करता यावी एकाच छताखाली सर्व काही सहज उपलब्ध होऊन गुणवत्ता, दर्जा व वाजवी दर उपलब्ध मिळावा म्हणून सदर उपक्रम आयोजित करत असल्याचे अध्यक्षा स्वाती ढवाण  यांनी सांगितले 

मतिमंद विद्यार्थ्यांनि बनविलेल्या दिवाळी वस्तुं उल्लेखनीय असल्याबद्दल त्यांचा "उत्कृष्ट वस्तू निर्माते " म्हणून सन्मान करण्यात आला.
मनीषा शिंदे,सुनंदा जगताप, संगीता साळुंखे, कल्पना माने, मनीषा खेडेकर, ऋतुजा नलवडे, गौरी पाटील, पूजा खलाटे, विना यादव, सुवर्णा केसकर, वंदना जाधव, अमृता सूर्यवंशी, छाया पाटील,ऐश्वर्या बागल आदी जिजाऊ सेवा संघाच्या महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले तर आभार एशवर्या बागल यांनी मानले 

 *चौकट:* 
बारामती शहर व तालुक्यातील 
घर व  संसार, नोकरी, व्यवसाय , सांभाळून   विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५१  महिलांचा
 " जिजाऊ नारी शक्ती गौरव" पुरस्कार देऊन सन्मानित आले 

फोटो ओळ: 
जिजाऊ सेवा संघ च्या प्रदर्शन  उदघाटन प्रसंगी, मान्यवर व पदाधिकारी व इतर

No comments:

Post a Comment