पोलीस ठाण्यातील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) मधील फरार सराईत गुन्हेगार तुषार हंबीर अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, October 29, 2026

पोलीस ठाण्यातील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) मधील फरार सराईत गुन्हेगार तुषार हंबीर अटक..

पोलीस ठाण्यातील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) मधील फरार सराईत गुन्हेगार तुषार हंबीर अटक..
राजगड :-" स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणची कारवाई ”राजगड येथील व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न करत खंडणी मागितल्याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९७ / २०२६ भा. न्याय.सं.क. १०९, १३७(२), १४१(१), १४० (२),११५(२), ३५१(२), ३५१ (३), १२६ (२), १२७ (४), १८९ (२), १८९ (४), १९१ (३), ६१ (२) सह पोक्सो कलम ८४, आर्म अॅक्ट ३,२५, ४,२७ सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधि १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२) व ३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांचा मुलगा हा मौजे कापूरहोळ, ता. भोर, जि. पुणे गावच्या हद्दीत कापूरहोळ नारायणपूर रोडवर गुरुकृपा मेडिकलसमोरून अॅक्टिवा मो.सा. नं. एमएच १२ टी एल ३००४ यावरून आपल्या घरी जात असताना, कार नं. एमएच १२ एक्स ई ५३५३ वरील चालकाने त्याच्या ताब्यातील कार आडवी मारून, त्यामधील इतर आरोपींनी फिर्यादी यांचा मुलगा पृथ्वीराज यास जीवे मारण्याच्या उद्देशाने बळजबरीने आरोपींच्या कारमध्ये बसवले.तसेच, "तुम्ही आमच्यावर केसेस करणार, मग आम्ही तुम्हाला सोडणार का?" अशी दमदाटी करून त्याच्या तोंडात
पिस्तुलाची नळी टाकत त्यास जीवे मारण्यासाठी पळवून नेत असताना पोलिसांना काही आरोपी मिळून आले होते.सदरचा गुन्हा गंभीर असल्याने आणि या गुन्ह्यातील फरार आरोपी तुषार नामदेव हंबीर (रा. गोंधळेनगर, श्री छत्रपती महाराज चौक, हडपसर, पुणे) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. हा आरोपी अटकेपासून बचाव करण्यासाठी वारंवार राहण्याची ठिकाणे व वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल सिम बदलत असल्याने त्याचा शोध घेणे शक्य होत नव्हते.
त्यामुळे सदर फरार आरोपीस लवकरात लवकर अटक करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल,पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची बैठक घेऊन फरार आरोपीस अटक करण्याबाबत सूचना दिल्या.
त्या अनुषंगाने, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे, फरार आरोपी हा हडपसर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून, गुन्ह्यातील फरार आरोपी तुषार नामदेव हंबीर वय ४०
वर्षे रा. गोंधळेनगर, श्री छत्रपती महाराज चौक, हडपसर, पुणे यास दि. २९/१०/२०२६ रोजी फुरसुंगी परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीवर खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, गर्दी मारामारी व आर्म अॅक्ट यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक
श्री. गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्रसिंह गौर, भोर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रामदास बाबर, संतोष तोडकर, राजू मोमीन, अमोल शेडगे,तुषार भोईटे, चेतन पाटील आणि भारत मोहळ यांनी केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राजेंद्रसिंह गौर, भोर उपविभाग हे करत आहेत.

No comments:

Post a Comment