ACB च्या कारवाईत 6 हजार घेताना वनपालाला पकडले..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 25, 2026

ACB च्या कारवाईत 6 हजार घेताना वनपालाला पकडले..!

ACB च्या कारवाईत 6 हजार घेताना वनपालाला पकडले..!
बारामती :- बारामतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत वन विभागातील एका वनपालाला 6 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडल्याची माहिती समोर आली आहे. जाहिर सिराज शेख (वय 47) असे संबंधित वनपालाचे नाव असून, या कारवाईमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे.
कामासाठी 10 हजारांची मागणी केल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या कामाच्या संदर्भात आरोपी वनपालाने स्वतःसह अन्य एका व्यक्तीसाठी एकूण 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. यापैकी 4
हजार रुपये यापूर्वी दिले होते, तर उर्वरित 6 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर 25 ऑक्टोबर 2026 रोजी नियोजनबद्ध सापळा रचण्यात आला.या कारवाईदरम्यान 6 हजार रुपयांची लाच स्वीकारताना संबंधित
वनपालाला पकडण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे,या प्रकरणी पुणे ग्रामीणमधील संबंधित पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार
प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.पुढील तपास चालू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित बाबींची सत्यता स्पष्ट करणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, संबंधित आरोपीवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे. तपासातून पुढे येणाऱ्या अधिकृत माहितीच्या आधारेच या प्रकरणातील संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment