बारामती:- बारामती तालुका पोलीस स्टेशन लगत असणारे पेन्सिल चौकाचे शेजारील मॉल समोर दोन गटात मारामारी करणाऱ्या इसमा विरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली अधिक माहिती अशी आहे की,दिनांक.25/10/2026 रोजी सायंकाळी 06:00 वा चे सुमारास मौजे सावळ गावामध्ये सुशांत मोहिते आणि श्रेया प्रताप आटोळे व प्रताप आटोळे यांचे आपसात गावामध्ये भांडण झाले होती त्याची आपसात तक्रार देण्यासाठी सुशांत मोहिते आणि श्रिया आटोळे व तिचा दीर निखिल आटोळे असे बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे रात्रौ 8:00 वा चे सुमारास तक्रार देण्यासाठी येत असताना पेन्सिल चौकातील मॉल च्या समोर त्यांनी दोघांनी आपापले मित्र बोलावून एकमेकांना दुकानासमोर मारहाण करू लागले तेवढ्यात तात्काळ एका मिनिटात त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि दोघांनाही त्या ठिकाणी पकडून पोलीस स्टेशनला आणले त्यानंतर त्यांच्या आपसातील पोलीस यांनी तक्रारी नोंदवण्याचे सांगितले असता त्यांनी आपसात एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या नाहीत म्हणून पोलिसांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही पार्ट्यांना पोलीस स्टेशनला जेरबंद करून ठेवले होते दोन्ही पार्ट्या विरुद्ध पोलीस स्टेशनला त्यांचे विरुद् कारवाई करण्यात आलेली आहे खालील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे,बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.रजि न 537/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 194 (2) फिर्यादीचे नाव व पत्ता- शहारुख शकिल शेख वय-26 वर्षे बारामती तालुका पोलीस स्टेशन आरोपी- 1) गणेश शरद आटोळे 2) विनोद विठ्ठल आटोळे 3) अनिकेत प्रमोद बेंगारे 4) विकास अशोक आटोळे, 5) तुषार बडु आटोळे 6) आदेश ज्योतीराम आटोळे 7) धनाजी संपत आटोळे 8) स्वप्निल शिवलाल आटोळे 9) अभिमान अंबुदास लांडगे 10) समाधान शशिकांत भिसे 11) सुशांत बाळु मोहिते 12) प्रितम अंकुश कुचेकर 13) मनोज सुहास बागाव 14) निखील शिवलाल आटोळे 15) सोहम राजु लोंढे 16) आदित्य अतुल भिसे सर्व रा. मावळ ता. बारामती जि. पुणे. हकीकत अशी की,दि. 24/10/2026 रोजी रात्रौ 8.30 वा चे सुमारास मी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे हजर असताना पेन्सिल चौक बारामती काही लोकांची भांडणे चालु असल्याचे दिसले. तेव्हा मी व पोलीस स्टेशन मधिल सपोनि पवार ,पोसई अमोल कदम, पोहवा खारतोडे, पोकों मनोज पवार, पोकॉ कदम तात्काळ सदर ठिकाणी जावुन पाहिले की, 07 ते 08 इसम पेन्सिल चौक येथे वाद घालुन दंगा करताना दिसले. पोलीस स्टेशनच्या स्टाफने तेथिल इसमांना पोलीस स्टेशन येथे घेउन येवुन चौकशी केली असता त्यांची नावे 1) गणेश शरद आटोळे 2) विनोद विठ्ठल आटोळे 3) अनिकेत प्रमोद बेंगारे 4) विकास अशोक आटोळे, 5) तुषार बंडु आटोळे 6) आदेश ज्योतीराम आटोळे 7) धनाजी संपत आटोळे 8) स्वप्निल शिवलाल आटोळे 9) अभिमान अंबुदास लाडगे 10) समाधान शशिकांत भिसे 11) सुशांत बाळु मोहिते 12) प्रितम अंकुश कुचेकर 13) मनोज सुहास बागाव 14) निखील शिवलाल आटोळे 15) सोहम राजु लोंढे 16) आदित्य अतुल भिसे सर्व रा. सावळ ता. बारामती जि. पुणे हे एकमेकांशी भांडण करत असल्याचे निदर्शनास आले. सदर सर्व इसम सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी प्रत्यक्ष भांडण करुन सार्वजनिक शांततेचा भंग करत होते. त्यामुळे तेथे उपस्थित नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला मी व सोबत असलेल्या पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी हस्तक्षेप करुन परिस्थीती नियंत्रणात आणली सदर घटनेबाबत वरिल सर्व आरोपींनी सार्वजनिकठिकाणी भांडण करुन सार्वजनिक शांततेचा भंग केलेला आहे तरी वरिल आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 194 (2) अन्वये कायदेशिर फिर्याद आली असून तपास दाखल अंमलदार पोहवा टिळेकर यांनी केली असून तपास पोहवा प्रदिप काळे करीत आहे.
Post Top Ad
Sunday, October 25, 2026
बारामतीत दोन गटातमारामारी;१६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल;तातडीने कारवाई..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment