बारामती तालुका पोलीस स्टेशनची कारवाई.
बारामती एम.आय.डी.सी व परीसरातुन मोटार सायकली चोरी करणारे २ आरोपी केले जेलबंद त्यांच्या कडून १० मोटार सायकल हस्तगत..
बारामती :-बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक २७/१०/२०२६ रोजी तक्रारदार पियुष मनोजकुमार तुशबंड वय २१ वर्षे, रा. खंडोबानगर बारामती ता. बारामती जि.पुणे यांनी त्यांची एक होंडा कंपनीची काळे रंगाची युनिकॉर्न मोटार सायकल नंबर एम.एच.४२/बी.क्यु/ ०६४४ ही व सदर मोटार सायकलचे सिटमध्ये फिर्यादीने ठेवलेले दोन व्हिवो कंपनीचे मोबाईल हॅन्डसेट असे दिनांक २६/१०/२०२६ रोजी रात्री ९:३० ते
दिनांक २७/१०/२०२६ रोजीचे सकाळी ६:०० वा. चे दरम्यान काळात डायनामिक्स डेअरी बारामती चे समोरुन कोणीतरी अज्ञात चोरटयाविरुद्ध चोरुन नेली वगैरे दिले तक्रारीवरुन बारामती तालुका पोलीस स्टेशन गु. रजि. नं ५३८ / २०२६ बी. एन. एस. कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल असुन दाखल गुन्हयाचा तपास पो. हवा.
सुधीर काळे हे करीत आहेत,दाखल गुन्हयातील मोटार सायकचे चोरीचे अनुशंगाने गोपनिय माहिती, तांत्रीक विश्लेषण करुन सदरचा गुन्हा हा आरोपीनामे १) इमरान फिरोज शेख वय २१ रा. अकलुज यशवंतनगर ता. माळशिरस जि. सोलापुर २) श्री उर्फ श्रीराज नवनाथ वाघंबरे वय २१ वर्षे, रा. विझोरी ता. माळशिरस जि.सोलापुर तसेच विधीसंघर्षीत बालक ३) कुणाल विशाल भालेराव रा. किर्तीनगर अकलुज ता. माळशिरस जि.सोलापुर यांनी केली असल्याची माहिती प्राप्त झालेने वरील आरोपी क १,२ यांचा बारामती तालुका पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने अकलुज सोलापुर येथे जावुन दोन टिम तयार करुन सापळा रचुन यातील आरोपी क्र १,२
यांना ताब्यात घेतले त्यांचे ताब्यात सदर गुन्हयात चोरीस गेली मोटार सायकल व मोबाईल फोन असे मिळुन आलेने सदरचा मुददेमाल जप्त केला असुन आरोपीस सदर गुन्हयाचेकामी अटक केली आहे.सदर अटक आरोपींकडे अधिक तपास करता त्यांनी बारामती येथुन आणखी ३ मोटार सायकली चोरी केल्याचे सांगीतलेने सदरचे मोटार सायकली पोलीसांनी अकलुज जि.सोलापुर येथुन जप्त केल्याने बारामती तालुका पोलीस स्टेशनचे मोटार सायकल चोरीचे आणखी तीन गुन्हे उघडकिस येवुन एकुण ४ मोटार सायकली, दोन मोबाईलस असा एकुण १,८५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल आरोपींकडुन हस्तगत केला असुन दाखल गुन्हयाचा अदयाप तपास चालू आहे.तसेच दाखल गुन्हयाचे तपासात बारामती तालुका पोलीस स्टेशनचे १) गु. रजि. नं
३१०/२०२६,२)२०८/२०२४, ३)६३/२०२५, ४) ४१४/२०२५, ५)४०९/२०२५, ६) ११२/२०२६
या गुन्हयातील मोटार सायकली या आरोपी नामे १) गणेश शिवा काळे वय २९ वर्षे, रा.मोरेवस्ती वरकुटे खुर्द ता.इंदापुर जि.पुणे, २) प्रज्वल प्रतापराव मुंडफुणे पाटील वय २४ वर्षे, रा. महाळुग ता. माळशिरस जि.सोलापुर
सध्या रा. पिटकेश्वर रोड निमगाव केतकी ता.इंदापुर जि.पुणे यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन सदर वरील आरोपींनी चोरी केलेल्या एकुण ०६ मोटार सायकल असा एकुण २,५०,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल आरोपींकडुन हस्तगत केला असुन अशा एकुण १० मोटार सायकलची एकुण ४,३५,०००/-
रुपये किंमतीचा मुददेमाल आरोपींकडुन बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेण्यात आलेल्यां आहेत.सदरची कामगिरी ही मा.संदिपसिंह गिल . पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. चैतन्य कदम सो. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग,यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी श्री. नारायण पवार, सपोनि विकम पवार, ग्रेड पोसई श्रीरंग शिंदे, तसेच गुन्हे शोध पथकाचे सहा फौजदार सुरेंद्र वाघ, पो.हवा. भारत खारतोडे, पो.
हवा. सुधिर काळे,पो.हवा. योगेश टिळेकर, पो.हवा. किशोर विर, पो.हवा सागर देशमाने, पो.कॉ.मनोज पवार, पो.कॉ.जितेंद्र शिंदे, अवधुत शिंदे, पो. कॉ. शाहरुख शेख, आर्यन कदम, यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा. सुधीर काळे हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment