विजयरणस्तंभावरील वादग्रस्त पाटी काढण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर चक्री उपोषण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

विजयरणस्तंभावरील वादग्रस्त पाटी काढण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर चक्री उपोषण..

*विजयरणस्तंभावरील वादग्रस्त पाटी काढण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर चक्री उपोषण*

पुणे: भिमाकोरेगाव येथील विजय रणस्तंभावर १ जानेवारी १८१८ च्या लढाईशी कोणताही संबंध नसताना विजय रणस्तंभावर लावण्यात आलेली सन १९६५ व १९७१ च्या भारत-चीन,भारत-पाक युद्धातील शाहिद जवानांच्या नावाची पाटी काढून टाकावी व १८१८ च्या लढाईतील शूरवीरांचा आणि त्या शहीद जवानांचा सन्मान राखून विजय रणस्तंभाचे प्रशासकीय पातळीवर होत असलेले विकृतीकरण थांबवावे या मागणीसाठी बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष आणि शेरसुहास मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भारत(दादा) अहिवळे हे दि.१० डिसेंबर २०२० पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यलया समोर आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह चक्री उपोषणा साठी बसले होते.यावेळेस त्यांना पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तब्बल ८० आंबेडकरप्रेमी व बहुजनप्रेमी संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता.
त्यानंतर त्यांच्या आंदोलनाची गंभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले.त्या मध्ये विजय रणस्तंभावर लावण्यात आलेल्या वादग्रस्त पाटी संदर्भात चर्चा झाली.येत्या काळात जर ही वादग्रस्त पाटी त्या विजय रणस्तंभावरून काढली नाहीतर महाराष्ट्रात सामाजिक अशांतता निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न  उदभवू शकतो.त्यामुळे आपण तातडीने या संबंधीची कार्यवाही सुरू करावी असे त्या बैठकी मध्ये आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले असता.जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने विजय रणस्तंभाच्या संबंधित सर्व विभागांना पत्र पाठवून या संबंधीचा अहवाल देण्याचे निर्देश दिले व अहवाल आल्या नंतर आम्ही यावर कारवाई करू असे आश्वस्त केल्या नंतर गेल्या १० दिवसां पासून सुरू असलेले चक्री उपोषण दि.१८ डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हाधिकाऱ्यां सोबतच्या सकारत्मक बैठकी नंतर आम्ही तात्पुरते स्थगित करत असल्याची माहिती शुभम अहिवळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान यावेळी भारतदादा अहिवळे यांच्या समवेत भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचे जेष्ठ विधिज्ञ ॲड.बी.जी.बनसोडे, भारतीय दलित कोब्राचे नेते ॲड.भाई विवेक चव्हाण,भारत मुक्ती मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन बनसोडे,दलित पँथर चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.घनश्याम भोसले,भारत मुक्ती मोर्चाचे ॲड.सुशिल अहिवळे भिम आर्मीचे अभिजित गायकवाड, भिम ब्रिगेड चे जयदीप सकट व शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment