*गोर-गरीब व गरजूंना शिवभोजनाचा आधार*
बारामती:-गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव असल्या कारणाने लाॅकडाऊन काळात हातावरचे पोट असणा-यांना शिवभोजनाच्या माध्यमातून एक वेळचे जेवण मिळत आहे.
मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जेष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांनी निदर्शनास आणून दिले की आमराई भागातील हातावरचे पोट असणा-या लोकांची संख्या जास्त आहे, त्यांना शिवभोजनाची गरज आहे म्हणून एक वर्षापासून माता रमाईभवन आमराई येथे दररोज न चुकता २०० लोकांचे जेवण देण्यात येते.
स्थानिक नगरसेविका मयुरी सुरज शिंदे यांनी शिवभोजन चालू राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. दररोज त्या ठिकाणी जाऊन सोशल डिस्टसचे पालन करून व्यवस्थितरीत्या शिवभोजनाचे वाटप करण्यात येत आहे.त्यामुळे लाभधारक समाधान व्यक्त करत आहेत.
No comments:
Post a Comment