शासन निर्णय त्वरित रद्द करावा व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या संविधानिक हक्काची पायमल्ली थांबवावी या करिता आक्रोश मोर्चा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, June 26, 2021

शासन निर्णय त्वरित रद्द करावा व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या संविधानिक हक्काची पायमल्ली थांबवावी या करिता आक्रोश मोर्चा...

शासन निर्णय त्वरित रद्द करावा व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या संविधानिक हक्काची पायमल्ली थांबवावी या करिता आक्रोश मोर्चा...                          पुणे:- आज राज्य शासनाने ७ मे २०२१ रोजी शासन निर्णय काढून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केल्यामुळे हा शासन निर्णय त्वरित रद्द करावा व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या संविधानिक हक्काची पायमल्ली थांबवावी याकरिता शासकीय मुद्रणालयीन  मागासवर्गीय कर्मचारी महासंघ व शासकीय फोटोझिंको मुद्रणालय मागासवर्गीय कर्मचारी संघटना पुणे यांच्या वतीने आरक्षण हक्क कृती समितीच्या निर्देशानुसार अध्यक्ष विकास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले सदर मोर्चामध्ये राहुल जोशी मनिष काळे भरत पवार गणेश पवार अशोक वाल्मिकी चंद्रशेखर कांबळे उल्हास गायकवाड सुरेश गायकवाड बबलू चव्हाण शाम  आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment