अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडूनकार्य हीच ओळख फाऊंडेशनचा गौरव - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडूनकार्य हीच ओळख फाऊंडेशनचा गौरव

अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून
कार्य हीच ओळख फाऊंडेशनचा गौरव
 बारामती  । दि. ९ (प्रतिनिधी) :
पर्यावरण, जलसंधारण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनिय
कार्याबद्दल बारामती येथील कार्य हीच ओळख फाऊंडेशनचे अंतरराष्ट्रीय
मानवाधिकार संघटनेकडून सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.
 ८ जुन २०१८ रोजी ‘कार्य हीच ओळख फाउंडेशन’ ची  स्थापणा करून
वृक्षारोपण,जलसंधारण, आरोग्य व रक्तदान शिबीर,किल्ले स्पर्धा, वाचनालय,
कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य हीच ओळख फाऊंडेशने दखलपात्र
कार्य केले आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळात अनेक गरजूंना जीवनावश्यक
वस्तूंचे वाटप, त्याचबरोबर समाजातील विविध घटकांना जीवनावश्यक साहित्य
वाटप असे विविध उपक्रम आपली संस्था समर्थपणे राबवत आहे. तसेच वृक्षारोपण
व त्यांचे संगोपण अशा उल्लेखनीय कार्याची मंगळवारी (दि. ८) अंतरराष्ट्रीय
मानवाधिकार संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ.विजयकुमार काळे यांच्या
हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर बनकर यांना सन्मानपञ देण्यात आले.
यावेळी रविकुमार काळे, सोनाली खाडे, गुनश्री रासकर, अक्षय धुमाळ, संदीप बनकर उपस्थित
होते.
——————————————————————
‘कार्य हीच ओळख फाउंडेशन’ च्या माध्यमातून आजवर विविध विधायक उपक्रम
राबविण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी कडक उन्हाळ्यात पक्षांची
धान्य-पाण्याची सोय होण्यासाठी ‘मुठभर धन्य,घोटभर पाणी’ ही संकल्पना
स्पर्धेच्या माध्यमातून सुरू केली. संस्थेच्या ‘हरित वृक्ष बन’ या
संकल्पनेच्या माध्यमातून वृक्षारोपण करणे आणि त्याचे संगोपन करण्याचे काम
केले जात आहे.

No comments:

Post a Comment