औरंगाबाद येथे आरएचपी क्लिनिक"ची दुसरी शाखा औरंगाबाद:- आरएचपी क्लिनिक"ची दुसरी शाखा औरंगाबाद येथे सिंधी कॉलनी मध्ये नुकतीच सुरू करण्यात आली. 'आरएचपी क्लिनिक'चे उद्घाटन औरंगाबादचे पंचवीस वर्षाहून अधिक काळ खासदार म्हणून नेतृत्व केलेले माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे केंद्रीय सचिव संजय जोशी, आरएचपी क्लिनिकचे संचालक गुरुबक्ष सिंग, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष शिवाजी गायकवाड, संचालक डॉ. प्रा. गणी पटेल, मराठवाडा विभागीय अध्यक्ष राजनभाई हौजवाला, अरविंद हौजवाला, सोलापूर विभागाचे समन्वयक भगवानराव परळीकर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रुग्णहक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभागी होऊन दुसऱ्या आर. एच. पी. क्लिनिकला शुभेच्छा दिल्या.
गेल्याच रविवारी पुण्यात आरएसपी हॉस्पिटल पुण्यात सुरू करण्यात आले तर आज औरंगाबाद येथे क्लीनिक सुरु करण्यात आल्याने सर्वांमध्येच मोठा उत्साह आहे.
No comments:
Post a Comment