बारामती शहर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला तीस हजाराची लाच घेताना अटक..!लाच घेणाऱ्या पोलिसांचा आकडा वाढतोय?
बारामती:-बारामती मध्ये लाच घेणाऱ्याचे प्रमाण वाढत चालले असल्याने खऱ्याचे खोटं, खोट्याचे खरं करण्यात माहीर असणारे काही पोलीस यांच्यामुळे चांगले काम करणाऱ्या पोलीसाला नाहक बदनाम व्हावं लागतं पोलीस खात्याकडे संशयास्पद बघितले जाते लोकांना चर्चेचा विषय होतो पण काही पोलीस अधिकारी नामदेव शिंदे सारखे यांनी चांगलीच पोलीस खात्याची मान उंचावली आहे,अश्यातच एखादी घटना घडली तर काय समजावं अश्या जनतेतून भावना व्यक्त होत आहे, नुकताच बारामती शहर पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार सहायक फौजदार संदिपान अभिमान माळी याला तीस हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले.
बारामती शहर पोलिस ठाण्याचा हा सहायक
फौजदार असून संदिपान अभिमान माळी असे याचे नाव आहे. याने 40 हजार रुपयांची लाच मागितली होती, त्यापैकी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला पकडले.तक्रारदाराच्या पत्नीने सावकारी कायद्यान्वये केलेल्या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र पाठवताना आपल्या बाजूने पाठवावे तसेच थोडी मदत करावी अशी विनंती केल्यानंतर माळी याने दाखल 40 हजार रुपयांची लाच तक्रारदाराच्या पत्नीकडे
मागितली होती.तडजोडीअंती तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने
त्यासंदर्भात पडताळणी केली. तेव्हा माळी आणि
लाच मागितल्याची निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आज सापळा रचला आणि या सगळ्यामध्ये माळी अलगद
सापडला.अधिक तपास चालू आहेअशी माहिती मिळाली. बारामतीत वारंवार का होत आहे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारवाई..चिंतन होणं गरजेचं असल्याचे सूर बारामतीकरांकडून उमटत आहे.
No comments:
Post a Comment