ट्रॅव्हल्स बसमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..राजगड पोलीसांनी आरोपींकडुन हस्तगत केले एकुण ३७,७२,२२२/-रूपये किमंतीचे ९८२ ग्रॅम व ३५० मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 27, 2021

ट्रॅव्हल्स बसमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..राजगड पोलीसांनी आरोपींकडुन हस्तगत केले एकुण ३७,७२,२२२/-रूपये किमंतीचे ९८२ ग्रॅम व ३५० मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने...

ट्रॅव्हल्स बसमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..राजगड पोलीसांनी आरोपींकडुन हस्तगत केले एकुण ३७,७२,२२२/-रूपये किमंतीचे ९८२ ग्रॅम व ३५० मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने...
राजगड:- पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे कमलेश सुकनराज राठोड हे हुबळी ते मुंबई असे व्हि.आर.एल. या ट्रॅव्हल्स, नंबर KA /25 AA/5943 ने प्रवास करीत असतांना त्यांचे सोबतच सदर टूॅव्हल्सने प्रवास करणारे सीट नं . २३,२४, व २५ वरील तीन अनोळखी इसम यांनी फिर्यादी यांची रोख रक्कम १८,००,०००/- रूपये व ८१,२४,०००/ - रूपये किंमतीचे २,११० ग्रॅम
वजनाचे १८ कॅरेटचे सोन्याचे वेगवेगळे दागीने असलेली खाकी रंगाची पाठीवर अडकविण्याची बॅग त्यांचे संमतीशिवाय, लबाडीने चोरी करून नेलेबाबत राजगड पोलिस स्टेशन गु.र.नं. ५७१/२०२१ भा.द.वि. कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा रजि. दिनांक ११/१०/२०२१ रोजी दाखल आहे.सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा.डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक साो, पुणे ग्रामीण यांनी
तपासाबाबत सुचना दिल्या होत्या.त्या अनुपंगाने अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक सचिन पाटील याचे मार्गदर्शनाखाली प्रमोद पोरे सहा पोलीस
निरीक्षक व पो.ना./ २३२० मदने यांनी सदर गुन्हयातील फिर्यादी हे ज्या ठिकाणी सोने देण्यासाठी हुबळी, होस्पेट, बेल्लारी राज्य कर्नाटक येथे गेले होते, त्या सदर ठिकाणी जावून सखोल तपास करून तांत्रिक पुरावा गोळा करून संशयित इसमांची छायाचित्रे प्राप्त केली. त्यानंतर सदर आरोपीं बाबतचा तांत्रिक तपास सचिन पाटील पोलीस निरीक्षक व पो.हवा./१८४२ खरात यांनी करून आरोपीची नावे निष्पन्न करून गोपनीय बातमीदारामार्फत त्याचा ठाव ठिकाणा शोधून कर्जत जिल्हा अहमदनगर, कुडुवाडी, जिल्हा सोलापृर या ठिकाणी २ टिम पाठवून तेथील स्थानिक पोलीसांची मदत घेवुन दिनांक २६/१०/२०२१ रोजी गोपनीय माहीतीच्या आधारे २ संशयित आरोपी नामे १) मारूती राजाराम पिटेकर, रा.माळंगी, ता.कर्जत, जि.अहमदनगर, २) आनंता लक्ष्मण धांडे,वालवड, ता.कर्जत, जिअहमदनगर यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले असता त्यांचेकडून गुन्हयातील एकुण ३७,७२,२२२ / -रुपये किमंतीचे ९८२ ग्रॅम व ३५० मिलीग्रॅम ( ९८ तोळे ) वजनाचे सोन्याचे कानातील रिंगा,जुमके, नेकलेम, गणीहार अशा प्रकारचे वेगवेगळे दागीने हस्तगत केले असून अधिक तपास चालू
आहे. सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये खालील प्रकारे गुन्हे दाखल आहे.आरोपी नामे- १) मारूती राजाराम पिटेकर, रा. माळंगी, ता.कर्जत, जि.अहमदनगर
अ.क. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम २५७/२०१८, भा.द.वि. कलम ३७९,३४ ६७/ २०१८, भा.द.वि. कलम ३९५ २२/२०२०, भा.द वि. कलम ३८०,३४ १२१/ २०१६, भा.द.वि. कलम ३५३,३३२,२२५,१ कराड शहर म्हैसुर रेल्वे राज्य कर्नाटक २ नंदुरबार जिल्हा
कर्जत ३४१०७,१८६,१४३,१४७,१४८,,१४९,४२७ आरोपी नामे-- २) आनंता लक्ष्मण धांडे, रा.वालवड, ता. कर्जत, जि.अहमदनगर अ.क. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम २५७/२०१८, भा.द.वि. कलग ३७९,३४ ६७/२०१८, भा.द.वि. कलम ३९५ २२/२०२०, भा.द.वि. कलम ३८०,३४ १२१/ २०१६. भा.द.वि. कलग ३५३,३३२,२२५,.१ कराड़ शहर २ न्हैगुर रेल्वे राज्य कर्नाटक  नंदुरबार जिल्हा
कर्जत ३४ १०७, १८६,१४३,१४७,१४८  ,१४९,४२७ आरोपींची गुन्हे करण्याची पध्दत:-सदरचे आरोपी हे त्यांचे भाऊबंद व नातेवाई असे एकत्र येवुन महाराष्ट्र व कर्नाटक
राज्यात फिरून सोन्यांचे व्यापाऱ्याची रेकी करून गुन्हे करतात.सदरचे आरोपी हे सोन्याचे होलसेल व्यापारी एका राज्यातुन दुसर्या राज्यात जावुन वेगवेगळया ठिकाणी सोन्याच्या दुकानदारांना दागिने विकतात. तेव्हा आरोपी हे सोन्याचे व्यापारी जातात/ राहतात त्या ठिकाणी आरोपी देवदर्शनासाठी आल्याचे सांगून मुक्काम करतात.
आरोपी हे व्यापाऱ्याचा संपुर्ण प्रवास दरम्यान पाठलाग करतात. व्यापारी ज्या गाडयामधुन चालले "आहेत त्या गाइयात स्वतःचे बुकींग करून प्रवास करतात व प्रवासा दरम्यान व्यापाऱ्याची। नजर चुकवुन किंवा झोपलेले असतांना व्यापाऱ्याची बँग पळवतात. लागलीच गाडी चालकाला माझे मूलाचा अपघात झाला आहे किंवा माझे घरी कोणी मयत झाले आहे. असा आताच निरोप आला असल्याचे सांगुन गाड़ी थाबवुन गाडीतुन उतरून चोरी करून पसार होतात.सदरचे गुन्हेगार हे आपले नातेवाईकांसोबत गुन्हे करतात तसेच गुन्हयात सामिल नसलेल्यानातेवाईकांना सुध्दा ते चोरीचा वाटा देतात. पोलीस त्यांना पकडण्यासाठी त्यांचे वस्ती मध्ये गेल्यावर महिलांना मोठ्या प्रमाणावर गोळा करून आरोपीचे अटकेस प्रतिबंध करतात. त्या प्रकारचे पोलीसांवर हल्ले केले बाबतचे गुन्हे कर्जत पोलीस स्टेशनला सदर आरोपींविरूध दाखल आहेत.सदरची कारवाई ही मा. डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, सचिन पाटील पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद पोरे, सपोनि मनोजकुमार नवसरे, पो. हवा खरात, पो.हवा.तोडकर, पो.हवा. घुले, पो.हवा माने, पो.ना.मदने, पो.ना.जाधव पो.को राजीवडे,पोलीस स्टेशनचे गोसई लोणकर गो हवा मारणे, पो.को.भोर यांनी केली असून स्थानिक पोलीस कर्जत पोली  ची यक्ष नदत घेवुन आरोपींना अटक करण्यात
आलेले आहे. अधिक तपास सपोनि प्रमोद पोरे हे करीत आहोत.

No comments:

Post a Comment