पत्रकार संघाच्या मागणीला वंचित न्याय देणार-अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 4, 2024

पत्रकार संघाच्या मागणीला वंचित न्याय देणार-अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर

पत्रकार संघाच्या मागणीला वंचित न्याय देणार-अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर
बीड (प्रतिनिधी):- कोरोनानंतर प्रिंटमिडीया निश्‍चितच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला भक्कम आधार देणे हि सरकारची नैतिक जबाबदारी आहे. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शासनाच्या तिजोरीवर भार न पडता उत्पन्न करातून वार्षिक पाच हजार रूपये सुट वृत्तपत्र खरेदीवर देण्याची मागणी रास्त केली आहे. या मागणीला न्याय मिळेपर्यंत वंचित खंबीरपणे साथ देईल असा विश्‍वास वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा तथा अकोला लोकसभेचे उमेदवार अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केला.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे वंचितच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर आले असता त्यांची पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या सुचनेवरून मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी भेट घेवून पत्रकार संघाच्या मागणीसंदर्भात निवेदन देवून सविस्तर विवंचन केले. यावर त्यांनी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी प्रिंटमिडीयाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अतिशय चांगला पर्याय सरकारपुढे मांडला आहे. सरकार विविध जनहितकारी उपक्रमामध्ये उत्पन्न करातून सवलत देते. मिडीया देखील लोकशाही टिकवण्यामध्ये देशाच्या प्रगतीमध्ये सामाजिक योगदान म्हणून काम पाहते. आज मिडीयामुळेच लोकशाही आणि संविधान सक्षम आहे. तेव्हा अडचणीत सापडलेल्या मिडीयाला बाहेर काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी निश्‍चितच भविष्यात समर्थ साथ देईल असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी पत्रकार संघाच्यावतीने वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे यांना देखील निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार बालाजी जगतकर यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment