नाव नवऱ्याचे..! पोर सोयऱ्याचे..!!राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याचा भलताच ताल..आतून घेतला माल.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 5, 2024

नाव नवऱ्याचे..! पोर सोयऱ्याचे..!!राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याचा भलताच ताल..आतून घेतला माल.!

नाव नवऱ्याचे..! पोर सोयऱ्याचे..!!राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याचा भलताच ताल..आतून घेतला माल.!
बारामती:-बारामतीत राजकिय वातावरण तापत असताना आपआपल्या पक्ष्याच्या ज्या आपल्या विचाराचे पक्ष घेऊन केलेल्या प्रचाराची सांगता सभा नुकताच पार पडली आज प्रचार थांबला असला तरी मात्र रात्र वैराची आहे, कधी कुठे काय आर्थिक देवाण घेवाण होईल मतदारांना आमिष दिले जाईल, आपल्या बाजूने मतदान वळविण्यासाठी आर्थिक माया पुरविली जाईल हे सांगता येत नसले तरी मात्र सद्या तरी मटण व ब्रियानी वर ताव मारताना मात्र कार्यकर्ते दिसत आहे.7 मे रोजी मतदान असल्याने खऱ्या अर्थाने पुढाऱ्यांनी आपण केलेले काम व त्यावर झालेले मतदान हे 4 जून रोजी मतदान पेटीतून आलेल्या निकालावरून दिसून येईल पण तो पर्यत गेली दहा पंधरा दिवस केलेल्या आपल्या सहयोगी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार पत्रक वाटून प्रत्येक घरोघरी करण्यात आले मात्र हे करीत असताना सर्वश्री असणारे जे स्वतःला सर्व श्रेष्ठ समजले जातात माझ्याच तालावर कार्यकर्ते नाचतात मी म्हणेल तसे वागतात,मीच करतो अश्या पद्धतीने वागणारा "मलिदा खाऊ..आपण दोघे भाऊ" असे महाभाग यांनी *पोर नवऱ्याचे.. नाव सोयऱ्याचे* म्हणी प्रमाणे वागणारे तथाकतीत पुढारी ज्यांनी कधी याअगोदर रस्त्यावर उतरून काम केले  नाही असे पुढारी गेली दहापंधरा दिवस मात्र दिसत होते, मात्र हे करीत असताना आपल्या सोबत येणाऱ्यांना फक्त लॉलीपॉप दाखवून स्वतः मात्र लाखोंचे लॉलीपॉप चा बॉक्स घेतल्याचे दबक्या आवाजात चर्चा चालू आहे, याबाबत लवकरच सत्य बाहेर येईलच पण आज गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या नौटंकीबाज कार्यक्रम व त्यातून येणार आउटपुट लवकरच दिसेल.अनेक कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांचा कश्या पद्धतीने वापर झाला हे वास्तव व त्यांनी अनुभवलेले काही क्षण हे लवकरच सविस्तर पणे पुढे येईलच पण असं वागणं जस की काय म्हणतात ना. *नाव नवऱ्याचे.. पोर सोयऱ्याचे..!* असा काहीसा प्रकार सद्या चालू असल्याचे दिसले प्रामाणिक पणे काम करणारा मात्र पडद्याआड झाकला गेला आणि चमकोगिरी करणारा, गुपचूप नेत्यांच्या गाठीभेटी घेणारा फक्त नेत्यांच्या लक्षात राहीला... *मलिदा खाऊ पुढाऱ्याचा भलताच ताल.. आतून खातोय माल*..पुढील वेळी आणखी वेगळं.

No comments:

Post a Comment