रेशनिंगचा काळा बाजार... काळाबाजारात जाणारा रेशनिंगचा ट्रक पोलिसांनी पकडला.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 27, 2021

रेशनिंगचा काळा बाजार... काळाबाजारात जाणारा रेशनिंगचा ट्रक पोलिसांनी पकडला.!

रेशनिंगचा काळा बाजार... काळाबाजारात जाणारा रेशनिंगचा ट्रक पोलिसांनी पकडला.!                                                                                                                       इंदापूर:-गोरगरीब लोंकाचे धान्य काळ्या बाजारात विकून गब्बरगंड झालेली कितीजण तरी अजूनही चोरून असे प्रकार करीत असल्याचे दिसत अशीच एक घटना नुकताच घडली चक्क पोलीसांनी ही कारवाई केली याबाबत सविस्तर असें की, पुणे-सोलापुर हायवेवर इंदापूर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळाबाजार जोरात सुरु आहे. आज इंदापूर पोलिसांनी सरडेवाडी येथील पुणे - सोलापुर हायवेवर काळ्या बाजारात विक्रीसाठी धान्य घेऊन जाणारा ट्रक पकडला आहे. याप्रकरणी चालकास अटक करून त्याच्या ताब्यातील ट्रकसह १५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी आंतरजिल्हा रँकेटचा शोध घेणे तसेच सूत्रधाराचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती इंदापूरचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली आहे.रामचंद्र अंबादास दळवी ( वय ४३, रा. खांडवी,ता.बार्शी, जि. सोलापूर ) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांचे
पोलीस पथक रात्रीचे गस्ती पथकाला सरडेवाडी
टोक नाक्याजवळ अशोक लेलॅड कंपनीच्या ट्रकमध्ये ( एचएम १३ एक्स ४७०९) पांढऱ्या रंगाच्या सोनाई कॅटलफिड लिमिटेड ( निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे लिहलेल्या प्लास्टिक बँगमध्ये ५० किलो याप्रमाणे ५०० बॅग
गव्हाचे आढळून आले. यासंदर्भात वाहन चालकास माहिती विचारली असता त्याने टाळाटाळ केली. यानंतर संशय आल्याने
पोलिसांनी अधिक तपासणी केली असता स्वस्त धान्य दुकानातील धान्य या ट्रकमध्ये असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून
गुन्हा दाखल केला. याप्रकरणी शासन आणि जनतेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस नाईक महेंद्र पवार यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.याबाबत अधिक तपास चालू असून पुरवठा विभागामार्फत दुकानदारांची प्रामाणिक तपासणी न झाल्याने व आर्थिक तडजोड करीत असल्याने असे धान्य दुकानदार काळ्या बाजारात विकत असल्याचे नागरिक बोलत आहे.

No comments:

Post a Comment