सणसर मध्ये जुगाराच्या अड्यावर पोलिसांचा छापा... सणसर:- पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर जवळ सणसर गावच्या हद्दीत नीरा डाव्याकालव्याच्या लगत झाडाखाली सुरु असलेल्या जुगाराच्या अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात पोलिसांनी आली.वालचंदनगर कारवाईत ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संतोष भिवा जाधव (वय-४२), हनुमंत गोपाळ
कुंभार (वय-३४ दोघे रा. निंबोडी), दत्तात्रेय गुलाब निंबाळकर (वय-५५), संजय बापु गर्जे (वय-२६ दोघे रा. भवानीनगर), भगवान गर्जेद्र
आगरकर (वय-५२ रा. बोरी), सोमनाथ प्रकाश जगताप, हनुमंत दादा धोत्रे (दोघे रा. सणसर)यांच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलीस नाईक विनोद पवार फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसर गावच्या हद्दीमध्ये नीर डाव्या कालव्याच्या लगतच्या झाडाखाली तीन पत्ती नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास
छापा टाकून कारवाई केली. कारवाईमध्ये सात जण तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना
आढळून आले.त्यांच्याकडून २८ हजार ७६० रुपये रोख व ८० हजार रुपयांच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे,सहायक
फौजदार शिवाजी निकम , गोरख कसपटे, पोलीस हवालदार मोहन ठोंबरे,गुलाब पाटील, विनोद पवार व किसन बेलदार यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार गुलाब पाटील करीत आहेत.अशीच कारवाई भिगवण हद्दीत सुद्धा असे जुगार अड्डे चालू असल्याचे समजते यावर कारवाई होईल का?
No comments:
Post a Comment